
‘आपलं शहर आपलं बजेट’ उपक्रम बातमी
लोगो- शनिवारी प्रसिद्ध टुडे १ मेन वरून
-
फोटो 82058
-
‘पर्यावरणा’च्या मूलभूत गोष्टींवर खर्च करा
पुरेसा निधी नाही; महापालिकेकडून पूर्णक्षमतेने उपाययोजना होत नाहीत
कोल्हापूर, ता. १२ ः शहरातील पर्यावरणाच्या संतुलनासाठी महापालिकेकडून पूर्णक्षमतेने उपाययोजना केल्या जात नाहीत. पर्यावरणीय कामांसाठी प्रशासन पुरेसा निधी देत नाही. उद्यान संवर्धने, वृक्ष लागवड आणि संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, प्रक्रियेतून कचरा निर्मूलनसाठी आवश्यक निधी खर्च होत नाही. जो निधी खर्ची पडतो त्याचे नियोजन नीट नसल्याने त्यातून काही उपलब्धी होत नाही. यासाठी पर्यावरण संतुलनासाठी मूलभूत गोष्टींवर निधी खर्च व्हावा, अशी अपेक्षा सकाळच्या ‘आमचं शहर, आमचं बजेट’ या उपक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केली.
चौकट
कृती आराखडा डोळ्यासमोर ठेवून निधी द्या
शहरातील पारंपरिक जलस्त्रोतांचे पुनर्जीवन करावे. शहरातील उद्यानांची देखभाल केली पाहिजे. नवी उद्याने विकसित करावीत. वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन करणे याचे नियोजन करून त्यासाठी निधीची तरतूद करावी. शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी के. एम. टी. व्यवस्था सक्षम करावी. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाईबरोबरच प्रबोधनाची आवश्यकता आहे. त्यासाठी निधी आणि कृती आराखडा करावा. कचरा आणि सांडपाणी यांच्या निर्मूलनासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. तसे झाले तर त्यातून उत्पन्नही मिळू शकेल. यासाठी कृती आराखडा डोळ्यासमोर ठेवून निधीची तरतूद करावी, असे मत पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक यांनी व्यक्त केले.
सूचना अशा...
- शहरातील कचरा संकलन व निर्मूलन पूर्ण क्षमतेने व्हावे
- प्रतिबंधित प्लास्टिकची निर्मिती, व्यापर यावर बंदी घालणे
- पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा आणि त्यातून मिळणारी दंडाची रक्कम पर्यावरण संवर्धनासाठी खर्च व्हावी
- वृक्षगणना आणि जैवविविधता सर्वेक्षण व्हावे
- शहरातील तलावांचे संवर्धन करण्यासाठीचा आराखडा पर्यावरणस्नेही असावा
---
प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ ः वृक्षांची गणना करण्यासाठी जीपीएस प्रणालीचा उपयोग करावा. शंभरवर्षांपेक्षा जास्त जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी विशेष योजना बनवावी. या दोन्ही गोष्टींसाठी निधीची पर्याप्त तरतूद केली पाहिजे.
-
उदय गायकवाड, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ ः शहराचा पर्यावरणीय आराखडाच बनवला नसल्याने पर्यावरण विषयासाठी महापालिका अंदाजपत्रकात केली जाणारी निधीची तरतूद ही सुनियोजित नाही. उपाययोजनांचे नीट नियोजन केले, तर त्यातून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होऊ शकतात.
-
ॲड. बाबा इंदुलकर, कॉमनमॅन संघटना ः शहरातील सांडपाणी व्यवस्थापन प्रभावी होण्यासाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद हवी. तसेच ही रक्कम त्याच बाबीवर खर्च होणे आवश्यक आहे. झूम प्रकल्पावरील कचऱ्यापासून इंधन बनवण्यासाठी निधीची तरतूद करून अंमलबजावणी करावी.
-
प्रा. डॉ. आसावरी जाधव, पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख ः महापालिका क्षेत्रात सौरउर्जेची निर्मिती आणि वापर वाढवण्यासाठी विशेष कृती आराखडा बनवून त्यासाठी निधीची तरतूद हवी. पर्यावरण संवर्धनाबद्दल नागरिकांत जनजागृती करण्यासाठीही खर्चाची तरतूद बजेटमध्ये करावी.
-
प्रा. चेतन भोसले, सहाय्यक प्राध्यापक, पर्यावरणशास्त्र विभाग ः गोमती आणि जयंती या दोन्ही नद्यांच्या काठी मोठ्या प्रमाणात वृक्षाच्छादन आणि जैवविविधता आहे. ते अबाधित राहाण्यासाठी आर्थिक तरतुदींसह योजना हवी. हवा प्रदूषण थांबवण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
-
आशीष कोंगळेकर, शहर प्रमुख, अर्थ वॉरिअरः पिण्याचेच पाणी अन्य वापरासाठीही वापरले जाते. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी वाया जाते. शहरात केवळ पिण्याचे पाणी देण्याची स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. वृक्ष संवर्धनावर आणि लागवडीवर लक्ष केंद्रित करावे.
-
अनिल चौगुले, निसर्गमित्र संस्था ः प्लास्टिकच्या पिशव्यांबरोबरच सण, उत्सवांना विविध प्लॅस्टिकच्या वस्तूही वापरल्या जातात. प्लास्टिक निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलावीत.