
डॉ. आंबडेकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन
ajr122.jpg.....
82284
आजरा ः कुदळ मारून भुमीपुजनाचा प्रारंभ अशोक चराटी यांनी केला. शशीकांत कांबळे, किरण कांबळे, एस. पी. कांबळे, विजय कांबळे आदी उपस्थित होते.
----------------------------
डॉ. आंबडेकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन
आजरा, ता. १२ ः येथील गांधीनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन होत आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोक चराटी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
खासदार संजय मंडलिक यांनी यासाठी पन्नास लाखांचा निधी दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी पुष्पहार घातला. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, नगरसेविका शकुंतला सलामवाडे, सुमैय्या खेडेकर यांच्याहस्ते झाले. येथे बौद्धविहार व्हावे, अशी आंबेडकरी चळवळ, परिवर्तनवादी संघटना व बौध्द समाजाचे स्वप्न होते. यासाठी प्रयत्न सुरु होते. नगरसेवक किरण कांबळे यांचे प्रयत्न व पाठपुराव्याने हे काम मार्गी लागले. नगरसेवक किरण कांबळे, एस. पी. कांबळे आदी उपस्थित होते. कास्ट्राईब संघटनेचे तालुका अध्यश्र विजय कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. आजरा सुतगिरणीचे संचालक शशिकांत सावंत यांनी आभार मानले.