
आजऱ्याच्या पाणी योजनेला मान्यता
ajr123.jpg.....
82289
आजरा ः येथील नगरपंचायतीमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांचा सत्कार अशोक चराटी यांनी केला. यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्ष अस्मिता जाधव, आनंदराव कुंभार, विलास नाईक उपस्थित होते.
----------------------------
आजऱ्याच्या पाणी योजनेला मान्यता
२५ कोटी ४१ लाखांची योजना; आमदार आबिटकर यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १२ ः आजरा शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. २५ कोटी ४१ लाखांची योजना असून केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत मान्यता मिळाली आहे. आजरा शहरांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. विशेष सहकार्य केलेले आमदार प्रकाश आबिटकर यांचा सत्कार नगरपंचायत व आजरा ग्रामस्थांच्यावतीने नगरपंचायतीच्या सभागृहात केला.
आमदार आबिटकर म्हणाले, ‘आजरावासीयांना अनेक दिवस नवीन पाणी पुरवठा योजनेची प्रतीक्षा होती. अशोकअण्णा चराटींच्या माध्यमातून या योजनेचा पाठपुरावा सुरू होता. याला मूर्त स्वरूप आले आहे. चांगल्या पद्धतीने हे काम होऊन शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. पुढेही शहरवासीयांचे विविध प्रश्न मार्गी लावू. आजऱ्यामधील क्रीडा संकुल, नाट्यगृह उभारणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण ही कामे होत आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्याचे नियोजन आहे. आजरा येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.’
श्री. चराटी म्हणाले, ‘सध्या शहराचा विस्तार वाढल्याने जुनी पाणी पुरवठा योजना अपुरी ठरत आहे. आमदार आबिटकर व मुख्यमंत्री शिंदे यांच्या योगदानातून नवीन नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.’ यावेळी चराटी यांच्याहस्ते आमदार आबिटकर यांचा सत्कार केला. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता जाधव, नगरसेवक किरण कांबळे, अनिरुद्ध केसरकर, सौ. शुभदा जोशी, विजयकुमार पाटील, दशरथ अमृते, इंद्रजीत देसाई, दता पाटील, विजय थोरवत, अमानुल्ला आगलावे आदी उपस्थित होते. नगरसेवक विलास नाईक यांनी स्वागत केले. आनंदराव कुंभार यांनी आभार मानले.