निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

03459
तानाजीराव मगदूम
मुरगूड : येथील माजी नगरसेवक, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी कार्यवाह व सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव अनंत मगदूम (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

82380
शोभा वडामकर
कोल्हापूर : उमरावकर गल्ली, उत्तरेश्‍वर पेठ येथील शोभा जयसिंग वडामकर (वय ८६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

82379
शकुंतला कोले
उजळाईवाडी ः येथील शकुंतला रामलिंग कोले (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

०३२७७
आनंदी पाटील
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील आनंदी पांडुरंग पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

03262
पांडुरंग कारंडे
राशिवडे बुद्रुक : बेले (ता. करवीर) येथील पांडुरंग राऊ कारंडे (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

02954
कमल सुतार
माजगाव : कोतोली (ता. पन्हाळा) येथील कमल गोविंद सुतार (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

03283
तुकाराम पोवार
कुरुंदवाड : शेडशाळ (ता.शिरोळ) येथील तुकाराम गणपती पोवार (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

04239
आप्पासाहेब पाटील
म्हाकवे : येथील माजी सैनिक आप्पासाहेब बाळू पाटील (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.१३) आहे.

01865
सावित्री गुरव
नानीबाई चिखली : कौलगे (ता. कागल) येथील सावित्री लक्ष्मण गुरव (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

01628
बाळू पाटील
बिद्री : मुदाळ (ता. भुदरगड) येथील बाळू ज्ञानू पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ‘सकाळ’चे अंक विक्रेते दत्तात्रय पाटील यांचे ते वडील होत.

02049
पारेशा विटेकरी
कोल्हापूर : गडहिंग्लेज येथील शेंद्री रोड विटेकरी मळा येथील पारेशा तानाप्पा विटेकरी (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.