Wed, March 29, 2023

बावडा यात्रा
बावडा यात्रा
Published on : 13 February 2023, 1:27 am
कसबा बावड्याची
आंबील यात्रा
बुधवारी होणार
कसबा बावडा ः येथील रेणुका देवीची आंबील यात्रा बुधवारी (ता. १५) होणार आहे. रेणुका भक्त संघटनेने याची घोषणा केली.
सौंदत्ती (कर्नाटक) येथे माघी पौर्णिमेला भरणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेला कसबा बावडा व परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक जातात. या यात्रेसाठी बावड्यातील मानाचे जग व काही भाविक बैलगाडीतून जातात. मानाच्या जगासह या बैलगाड्या परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बावड्यातील रेणुका देवीची आंबील यात्रा भरते. सौंदत्तीला गेलेल्या या बैलगाड्या उद्या (ता. १४) सायंकाळी कोल्हापुरात येत असल्याने आंबील यात्रा बुधवारी होणार आहे.