आवश्यक- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- संक्षिप्त
आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

sakal_logo
By

82534
प्रसाद जाधवच्या उपकरणाची निवड
कोल्हापूर ः वाठार (ता. हातकणंगले) येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून पारगाव येथील पाराशर हायस्कूलच्या प्रसाद जाधवच्या उपकरणाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. दिव्यांग गटातून त्याने प्रदर्शनात स्मार्ट हेल्मेट हे उपकरण सादर केले. हेल्मेट घातले तरच वाहन सुरू होते, अशा प्रकारचे हे उपकरण आहे. त्याच्या या यशाबद्दल आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार झाला. त्याला अभय शेलार, विनायक मेथे, स्वाती कोकितकर, विनायक कोकितकर, बी. जी. करवडे, प्राचार्य एस. वाय. काटे यांचे मार्गदर्शन लाभले.
..............
व्हॅलेंटाईन डेनिमित्त आज रक्तदान शिबिर
कोल्हापूर ः व्हॅलेंटाईन डेनिमित्त उद्या (मंगळवारी) युवा ऑर्गनायझेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. प्रेमोत्सव साजरा करतानाच तरुणाईमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने गेली सतरा वर्षे युवा ऑर्गनायझेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा पाचशे बाटल्या रक्त संकलनाचे उद्दिष्ट आहे. राजारामपुरीतील राजाराम गार्डन येथे दिवसभर शिबिर सुरू राहणार असून, इच्छुकांनी रक्तदान करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.