
पेद्रेवाडी प्राथमिक शाळा समुह नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम
82567
कोल्हपूर : पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील विठ्ठल विद्यामंदिर शाळेच्या समूहनृत्यामधील विजेत्यांचा सत्कार करताना मान्यवर.
पेद्रेवाडी प्राथमिक शाळा
समूह नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम
भादवण, ता. १४ : जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत समूहनृत्य प्रकारात पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील विठ्ठल विद्यामंदिर शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी गोवा राज्यातील दिवली नृत्य सादर केले. समर्थ सागर शिंत्रेच्या सुरेल गायनाने प्रेक्षकांची मन जिंकली. आर्यन मंगेश बाणेकर, आर्यन अर्जुन कदम, साहिल सुनील गायकवाड, कुणाल संतोष आजगेकर, सबुरी संदीप कबीर, वैष्णवी सागर ढवळे, सानवी दयानंद देवरकर, केतकी महेंद्र दिवेकर, आदिती संतोष पाटील, श्रावणी रवींद्र चव्हाण यांनी नृत्यमध्ये सहभाग घेतला. सागर कांबळे, मीनाक्षी दोड्डमनी, विपुल गाडे यांनी मार्गदर्शन केले. पांडुरंग मांगवकर, अनिल बागडी, सचिन कांबळे, विश्वनाथ कांबळे यांनी संगीत साथ दिली. गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी, विलास पाटील व केंद्र मुख्याध्यापक अशोक लोहार, मुख्याध्यापक श्रीधर मांगले, विजय कातकर, शशिकांत पाटील, हणमंत सुतार, सोनाली करडे यांचे प्रोत्साहन लाभले. ग्रामस्थांनी आर्थिक पाठबळ दिले.