
डॉ. वासुदेव देशिंगकर
82532
डॉ. वासुदेव देशिंगकर
यांना रोटरी जीवनगौरव पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः येथील कर सल्लागार, माजी रोटरी गव्हर्नर, लेखक डॉ. वासुदेव देशिंगकर यांना नुकत्याच बेळगाव येथे झालेल्या रोटरी जिल्हा ३१७० च्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये रोटरी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘रोटरी’चा हा बहुमान मिळणारे कोल्हापुरातील ते पहिलेच रोटरी सदस्य आहेत.
डॉ. देशिंगकर गेली ४५ वर्षे ‘रोटरी’च्या माध्यमातून कार्यरत असून, यापूर्वीही ‘रोटरी‘सह अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचा पुरस्कारांनी गौरव केला आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. त्याशिवाय विविध विधायक उपक्रमांत त्यांचा नेहमीच सक्रीय पुढाकार राहिला आहे. विविध विषयांवरील त्यांचे लेखन वाचकप्रिय आहे. ‘रोटरीर्चे गव्हर्नर म्हणून त्यांनी राबवलेले विविध उपक्रम पुढील पिढीसाठी आदर्शवत ठरले आहेत. बेळगाव येथे झालेल्या या स्नेहसंमेलनात कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतून दोन हजारांहून अधिक रोटरी सदस्य उपस्थित होते.