
दगड घडविणारे कलाकार अन् दगडांची घडाई भाग ४
लोगो कालच्या टुडे ३ मेन मधून
--
फोटो- 82727
---
सौंदर्यीकरणात दगडी वास्तूच लक्षवेधी
---
कलाकारांची वानवा; वाळू, सिमेंट, अन्य वस्तूंचा वापर वाढला
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : दगडी घर असावं, अशी अनेकांची इच्छा असते; पण ते तयार करण्यासाठी लागणारे कलाकार मिळत नाहीत. असे कलाकार पूर्वी उत्तर कर्नाटक, मराठवाडा, कोकण आदी भागांतून घडई करण्यासाठी येत; पण वाळू, सिमेंट आणि अन्य वस्तूंचा वापर होऊ लागला, तसे दगडी घराची बांधणी मागे पडू लागली.
मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, उत्तरेश्वर, रविवार पेठ, जुना बुधवार आदी परिसरात अनेकांची दगडी घरे आजही दिसतात. काही घरांची पडझड झालेली दिसते. काहींनी तर किरकोळ डागडुजीसाठी सिमेंटचा वापर करून घर सुस्थितीत केलेले दिसते; पण रिस्टोरेशन (पुनर्रचना) तंत्रज्ञानाचा वापर करून जुने दगडी घर आहे, त्या सुस्थितीत आणणे हे कौशल्यच असते. असे रिस्टोरेशन तंत्रज्ञानाचा वापर करणारे तंत्रज्ञ मिळत नाहीत. पारंपरिक गवंडी, सेंट्रिंग काम करणारे अशा डागडुजीसाठी येतात. ज्या काळात ही दगडी घरे बांधली, त्या काळात दगड बसविण्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्या, ते दगड कसे बसविले याचा अभ्यास करावा लागतो. खरे तर, शहर सौंदर्यीकरणात दगडी घराची वास्तूच लक्षवेधी ठरते.
(समाप्त)
...
कोट
संपूर्ण दगडी घर तयार करायला रोज २० याप्रमाणे घडीव दगड तयार करणारे लोक लागतील. प्रत्येकाने रोज आठ ते दहा दगड घडविले तरी हे दगड मापात बसविणे, दगडाला लागणारे सिमेंट, माती, गारा तयार करणे आदींसाठी दीड वर्ष लागते. तेही असे घर मोठे उभे करायचे तर. त्यासाठी लागणारे कलाकार हल्ली मिळत नाहीत.
- गोविंद यळगुडकर
...
चौकट
दर्जा भरणे अन् गिलावा
घराच्या भिंती सपाट व गुळगुळीत राहण्यासाठी व स्वच्छतेसाठी गिलावा करावा लागतो. बांधकामासाठी वापरलेला संयोजक बांधकामाच्या पृष्ठावरील सांध्यात तसाच राहू दिला तर वातावरणामुळे तो टिकत नाही, म्हणून पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत सांध्यातील संयोजक उकरतात. बांधकामावर गिलावा करावयाचा नसेल तर त्याला दर्जा भरणे म्हणतात. भिंतीत शक्यतो पाणी झिरपू नये म्हणून गिलावा करावा लागतो. दगडी आधारावर केलेल्या गिलाव्याची जाडी ३० मिलिमीटरपर्यंत असते; तर काँक्रीटच्या कामावर सहा मिलिमीटर जाडीचा गिलावा पुरेसा होतो. माती, चुना, जिप्सम, सिमेंट, निवळीनंतर राहिलेला मऊ चुना (संदला) हे गिलाव्यांचे मुख्य घटक आहेत.
चौकट
बांधकामातील संज्ञा
तुम्ही दगडी घर बांधा किंवा सिमेंटचे. यासाठी बांधकामातील काही संज्ञा असतात. जसे की पाया, जोते, पाटथर, कंगोरा, कुडवा, कोबा, वीटकुर, बगला, फाट, छावणी, चांदई, आडभिंती, पडभिंत, घोडनट, कंगणी, गलथा, रमणा, पेंड, गांट, आळे, चप/कोर टाकणे, मुंडेरी, तराफा. या सर्व संज्ञांचा वापर करून घर तयार होते.