
मानस हेल्पलाईन
‘टेली मानसं’ सेवेस सुरवात
कोल्हापूर ,ता. १४ ः केंद्रीय आरोग्य आणि कुंटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ‘टेली मेंटल हेल्थ असिस्टनन्स ॲण्ड नेटवर्किंग ॲक्रोस स्टेटस’ (टेली मानसं) असा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची सुरवात येथे झाली असून १४४१६ हेल्प लाईनवर संपर्क करून या सेवेचा रूग्णांना लाभ घेता येणार आहे, अशी माहिती सेवा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी दिली.
राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम हा कक्ष सेवा रूग्णालय कसबा बावडा येथे सुरू झाला आहे. येथे मानसिक आजार असलेल्या रूग्णांवर उपचार, समुपदेशन, मोफत औषधोपचार करण्यात येतात. घर बसल्या यासेवेचा लाभ घेण्यासाठी हेल्प लाईनवर कॉलकरून मानसिक आरोग्याची माहिती, शंका निरसण व मार्गदर्शन घेता येणार आहे. सेवा रूग्णालयातील मानसिक आरोग्य विभागा मार्फतही सेवा दिली जात आहे. या व्यतिरिक्त सोमवार, बुधवार, शनिवार ओपीडी सेवा तर मंगळवार, गुरूवार, शुक्रवार या दिवशी क्षेत्रा भेटीनुसार ही सेवा मिळणार आहे.