सुमंगल लोकमहोत्सव
देशी प्रजातींच्या जनावरांचे भव्य प्रदर्शन
देशी गाय, गाढव, बैल, अश्व, श्वान यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. १४ ः कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० फेब्रुवारीपासून होणाऱ्या सुमंगल लोकोत्सवात गाढवांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मिळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन होत आहे. २१ ते २३ फेब्रुवारी या काळात हे प्रदर्शन असेल.
दरम्यान, याचठिकाणी देशी प्रजातींच्या गाय, म्हशी, बकरी, अश्व, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्या प्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. प्रदर्शनाबरोबर प्रत्येक जनावरांच्या विविध गटांत भव्य स्पर्धा होणार असून त्यासाठी ६९ लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना २१ हजारांपासून ते एक लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
पर्यावरण रक्षणाबरोबरच देशी प्रजातींच्या जनावरांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागाच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. देशभरातून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात नावनोंदणी केली आहे. मठावर गोशाळा असून येथे हजारावर गायी आहेत. नुकतेच येथे भटक्या कुत्र्यांची शाळा सुरू करण्यात आली आहे. देशी प्रजातींच्या जनावरांचे भव्य प्रदर्शन हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट गाय आणि बैलाला एक लाखाचे तर म्हैस व रेड्याला ५१ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. मांजर, श्वान, शेळी, बोकड यांच्याही स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. देशभरातील विविध जातींचे अश्व येथे पाहायला मिळणार आहेत. देशी अश्व स्पर्धेत प्रथम क्रमांकास एक लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक जनावरांमध्ये नर व मादी अशा दोन गटांत बक्षिसे दिली जाणार आहेत.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.