Wed, March 29, 2023

स्वच्छतागृह
स्वच्छतागृह
Published on : 14 February 2023, 6:08 am
82791
महिलांसाठी स्वच्छतागृहाचे
गांधी मैदान येथे काम सुरू
कोल्हापूर, ता. १४ : गांधी मैदान यथे महापालिकेच्या वतीने महिलांसाठी स्वच्छतागृहाचे काम सुरू केले आहे. विभागीय कार्यालय एकजवळ त्याचे बांधकाम सुरू आहे. यासाठी २० लाख खर्च करण्यात येत आहे. स्वच्छतागृहाचा उपयोग गांधी मैदान येथे भरणाऱ्या स्पर्धेमधील महिला खेळाडूंना होणार असून, दिवाळी व नवरात्रौत्सवाच्या कालावधीत भाविकांना होणार आहे. या काळात गांधी मैदानात मोठ्या प्रमाणात भाविकांच्या गाड्या उभ्या केल्या जातात. त्याचबरोबर महापालिकेच्या महिला कर्मचारी व फिजिओथेरपीसाठी येणाऱ्या महिलांनाही उपयोग होणार आहे.