Fri, March 31, 2023

पगाराची प्रतीक्षा
पगाराची प्रतीक्षा
Published on : 14 February 2023, 5:09 am
महापालिकेतील
कायम कर्मचारी
पगाराच्या प्रतीक्षेत
कोल्हापूर : अर्धा महिना होत आला तरी अजून महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार झालेला नाही. दोन दिवसांत त्यांचा पगार होण्याची शक्यता आहे.
रोजंदारी, ठोकमानधन, तसेच पेन्शनधारकांची रक्कम जमा झाली. त्यालाही १४ तारीख उजाडावी लागली. कायम कर्मचाऱ्यांचे पगार अजूनही झालेले नाहीत. दहा तारखेच्या आसपास नियमित पगार होतात. फेब्रुवारीमध्ये प्राप्तिकर भरण्यासाठी कर्मचारी पगारातील रक्कम वर्ग करण्याचे प्रस्ताव देतात. त्यामुळे कामकाजाला वेळ लागला आहे. तसेच या महिन्यात महागाई भत्त्याचा फरक जमा केला आहे. त्यामुळे तिजोरीवर भर पडला आहे. शासनाकडून आलेल्या अनुदानातून इतर कर्मचाऱ्यांचे पगार केले, पण कायम कर्मचाऱ्यांचा पगार अजून झालेला नाही.