शिक्षक भरतीमध्ये क्रीडा शिक्षकांना प्राधान्य का नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक भरतीमध्ये क्रीडा शिक्षकांना प्राधान्य का नाही?
शिक्षक भरतीमध्ये क्रीडा शिक्षकांना प्राधान्य का नाही?

शिक्षक भरतीमध्ये क्रीडा शिक्षकांना प्राधान्य का नाही?

sakal_logo
By

83005

क्रीडा शिक्षकांना शिक्षक
भरतीत प्राधान्य का नाही?

शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा सवाल

कोल्हापूर, ता. १५ ः राज्यात शालेय शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे भरली जाणार आहेत, मात्र यामध्ये क्रीडा शिक्षकांची पदे नगण्य आहेत. ही पदे अधिकाधिक संख्येत भरली पाहिजेत. तसेच २० पेक्षा कमी पट संख्येच्या शाळेत निवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा शासनाचा विचार आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. राज्यात सुशिक्षित बेकार असताना निवृत्त शिक्षकांची नेमणूक करणे योग्य नाही. हा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना दिले.
शासनाने २० वर्षांत शिक्षक भरती केलेली नाही. त्यानंतर यंदा सुमारे ३० हजार शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत, पण यामध्ये क्रीडा शिक्षकांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. चांगले क्रीडा शिक्षक असतील तर चांगले खेळाडू तयार होतील. यासाठी क्रीडा शिक्षकांची भरती आवश्यक त्या प्रमाणात झाली पाहिजे. शिष्टमंडळात रमेश मोरे, अशोक पोवार, चंद्रकांत सूर्यवंशी, कादर मलबारी, दीपक गौड, प्रकाश आमते, राजाराम कांबळे, पंपू सुर्वे, जलराज कदम, सुरेश कदम यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

कोट
पूर्वी शासनाच्या पवित्र पोर्टलमध्ये क्रीडा शिक्षकांसाठी पर्याय नव्हता. मात्र, आता पोर्टलमध्ये बदल करून क्रीडा शिक्षकांचा पर्यायही दिला जाणार आहे. निवृत्त शिक्षकांच्या नेमणुकीबद्दल मात्र कोणतीही माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही.
- महेश चोथे, शिक्षण उपसंचालक