Mon, March 27, 2023

दुंडगेत मंगळवारी व्हॉलिबॉल स्पर्धा
दुंडगेत मंगळवारी व्हॉलिबॉल स्पर्धा
Published on : 16 February 2023, 5:38 am
दुंडगेत मंगळवारी व्हॉलिबॉल स्पर्धा
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे हनुमान यात्रेनिमित्त खुल्या शुटिंग व्हॉलिबॉल स्पर्धा होणार आहेत. मंगळवारी (ता.२१) सायंकाळी पाचला प्राथमिक शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा होईल. विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१, १००१ रुपयांचे रोख बक्षीस आहे. याशिवाय बेस्ट शुटर व बेस्ट स्कूपरसाठी ७५१ रुपयांची वैयक्तिक बक्षिसे आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क आहे. इच्छूक संघांनी अविनाश मगदूम व सचिन नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.