Fri, March 31, 2023

डॉ. गोरल यांचा सत्कार
डॉ. गोरल यांचा सत्कार
Published on : 17 February 2023, 12:03 pm
chd163.jpg
83186
पाटणे फाटा ः डॉ. एस. डी. गोरल यांचा सत्कार प्राचार्य उत्तम पाटील यांनी केला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------
डॉ. गोरल यांचा सत्कार
चंदगड ः येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. एस. डी. गोरल यांची शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व्यवस्थापन अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालयात सत्कार केला. प्राचार्य उत्तम पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला. गोरल यांनी यापूर्वी अभ्यास मंडळावर फॅकल्टी सदस्य म्हणून काम केले. पीएचडीचे मार्गदर्शक आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत सहभाग घेतला आहे. त्यांचे चाळीस शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.