हरकतींचा पहिला टप्पा यशस्वी
हरकतींचा पहिला टप्पा यशस्वी
---
वीजदरवाढीचा प्रश्न; आंदोलन कार्यक्रम ताकदीने राबविण्याचे आवाहन
इचलकरंजी, ता. १६ ः वीज दरवाढीविरोधात विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. हरकती दाखल करण्याचा पहिला टप्पा यशस्वी झाला. यात ‘महावितरण’ने मागणी केलेली सरासरी ३७ टक्के दरवाढ पूर्णपणे रद्द करावी व राज्यातील सध्याचेच वीजदर कमी करून देशातील अन्य राज्यांच्या तुलनेने समपातळीवर आणावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. यासाठी २८ फेब्रुवारीला सकाळी अकराला वीजदरवाढ प्रस्ताव होळी आंदोलन करण्यात येईल. राज्यातील वीज ग्राहक व विविध ग्राहक संघटना यांनी हा आंदोलन कार्यक्रम ताकदीनिशी राबवावा, असे आवाहन समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे.
आंदोलनादिवशी राज्यात सर्वत्र स्थानिक, तालुका व जिल्हा पातळीवर मोर्चे आयोजित करण्यात येतील. वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात येईल आणि राज्य सरकार व महावितरण यांना निवेदन देण्यात येणार आहे. राज्यात शक्य होईल, तेथे ग्रामसभेत वीजदरवाढ विरोधी ठराव करून शासन, कंपनी व आयोगाकडे पाठविण्यात येईल. हरकती दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तीन हजार २४६ हरकती नोंद झाल्या आहेत. शिवाय, ई-मेलद्वारे अनेक हरकती गेल्या आहेत. याशिवाय, अनेक ग्राहकांनी प्रत्यक्षात हरकती दाखल केल्या. हरकती दाखल करण्याचे वाढलेले हे प्रमाण निश्चितच चांगले आहे. या वेळी विविध ग्राहक व औद्योगिक संघटनांनी स्वतःहून मेहनत घेतली. त्यामुळे प्रचंड संख्येने हरकती नोंद झाल्या आहेत.
हरकतदारांनी २१ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान होणाऱ्या ई हियरिंगमध्ये म्हणणे स्पष्टपणे व पूर्ण ताकदीने मांडणे. तसेच, २५ फेब्रुवारीपर्यंत आमदार, खासदार, मंत्री यांना भेटणे व २८ फेब्रुवारीला या वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करणे हे सर्व कार्यक्रम सर्व संघटनांनी व वीज ग्राहकांनी पूर्ण ताकदीनिशी राबविण्यात येत असल्याची माहिती समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे, मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, डॉ. एस. एल. पाटील, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे सचिव रावसाहेब तांबे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रशांत मेहता, प्रमोद खंडागळे आदींनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.