पुणे परिषद….. 
पुणे परिषद…..

पुणे परिषद….. पुणे परिषद…..

महाकॉनक्लेव्ह परिषद (साखर परिषद)

प्रतिक्रिया…

नरंदेच्या माळावर ‘शरद’ची घोडदौड
शरद सहकारी साखर कारखाना लोकनेते, स्वर्गीय शामराव पाटील (यड्रावकर) यांनी प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रम घेऊन नरंदेच्या माळरानावर स्थापन केला. हा कारखाना सुरवातीस २५०० टनप्रमाणे सुरु झाला. साखर उत्पादनाबरोबर १३ मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला. आधुनिकीकरणाचा अवलंब करून गाळप क्षमता २५०० टनावरून ४९०० टनपर्यंत वाढ करून, कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन घेतले जात आहे. उत्पादन खर्च कमी झाल्याने ऊसाला जास्तीत-जास्त दर देणेची परंपरा ठेवली आहे. शेती उत्पादन वाढण्यासाठी सुधारित ऊस बियाणे, खते, औषधे, ठिबक संच, क्षारपड जमीनमुक्ती योजना राबविल्या आहेत. कारखान्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अत्याधुनिक प्रदूषणविरहित असा प्रतिदिनी ३० केएलपीडी क्षमतेचा स्पिरीट व इथेनॉल प्रकल्प सुरू केला. भविष्यात गाळप क्षमतेत १०,००० टन वाढ तसेच २८ मेगावॉट को-जनरेशन वीज प्रकल्प, १३० केएलपीडी डिस्टिलरी प्रकल्पात वाढ केली जाईल. या घोडदौडीमुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून शरद सहकारी साखर कारखान्यास राज्यस्तरीय पहिला व दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
01903
- माजी राज्यमंत्री, आमदार, डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर),
चेअरमन - शरद सहकारी साखर कारखाना लि. नरंदे
-----------------

क्षारपड जमीन सुधारणा पॅटर्न ‘दत्त’ची ओळख

कारखान्याने १९८९ पासून ऊसविकास योजना राबवली जात आहे. सभासद, ऊस उत्पादकांनी सहभाग नोंदविल्यामुळे, सरासरी एकरी उत्पादन ५१ टनापर्यंत गेले. हे देशातील सर्वोत्कृष्ट उत्पादन ठरले आहे. काही शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन १५० टनापेक्षा अधिक गेले आहे. येथील जमिनीतील सेंद्रिय कर्ब ०.३५ वर पोचला होता; मात्र ऊस विकास योजना राबवल्यामुळे, सेंद्रिय कर्ब ० .८५ वर पोचला आहे. यामुळे कारखान्याची ऊस विकास योजना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदायी ठरली. अतिरिक्त पाणी व रासायनिक खतामुळे, शिरोळ तालुक्यातील अनेक गावांतील जमिनी नापीक बनल्या होत्या. या शेतकऱ्यांना संघटित करून सच्छिद्र पाईप प्रणालीद्वारे, क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम कारखान्याच्या माध्यमातून राबवला जात आहे. तीन वर्षांत ७५०० एकर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी, ‘दत्त’चा क्षारपड सुधारणा पॅटर्न राबवल्यामुळे, या जमिनी लागवडीयोग्य होऊन, उत्पादन निघत आहे. ‘दत्त’च्या माध्यमातून राबण्यात येत असलेला क्षारपड जमीन सुधारणा पॅटर्न क्षारपडग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवणारा ठरला आहे. तो देशाला दिशा देणारा ठरला आहे.
82763
- उद्यानपंडित, गणपतराव पाटील
चेअरमन, श्री दत्त शेतकरी साखर कारखाना, शिरोळ.
-------------------------------
01634, 01635

सहकारातील नवा ब्रँड बिद्री कारखाना
बिद्री : सध्या सहकार क्षेत्राला अनंत अडचणीचा सामना करावा लागत असताना बिद्री साखर कारखान्याने गाळप आणि अन्य प्रकल्पांतून केलेले नवनवीन विक्रम आणि मिळवलेले पुरस्कार पाहता हा कारखाना म्हणजे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सहकार क्षेत्रासमोर नवा ब्रँड म्हणून उदयास येत आहे. कारखान्याने राबवलेले सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, वाढीव गाळप क्षमता विस्तारीकरण आदीमुळे आर्थिक स्थैर्य लाभले आहे.सध्या डिस्टलरी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून लवकरच ते पूर्णत्वास येईल. कारखान्याचा उल्लेख जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मातृसंस्था म्हणून केला जातो. गेल्या ६० वर्षात कारखान्याने ही बिरुदावली अभिमानाने मिरवत अन्य कारखान्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. कारखान्याने तयार केलेल्या पाऊलवाटेवर चालण्याचा प्रयत्न अन्य साखर कारखान्यांनी केला आहे. कारखान्याला देश पातळीवरील मिळालेला पुरस्कार हीच केलेल्या कामाची पोहोच पावती आहे. या पुरस्कारामुळे संचालक मंडळाची जबाबदारी वाढली असून पुढील काळात ही यशाची पताका कायम राखण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वसामान्य ऊस उत्पादक सभासदांचा मानसन्मान आणि त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न करण्यात कदापी मागे राहणार नाही .

01634
- माजी आमदार के. पी. पाटील, अध्यक्ष बिद्री साखर कारखाना
--------------
शाहू कारखाना सहकारातील दीपस्तंभ
सहकारातील हिंदकेसरी म्हणून ओळखले जाणारे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेला श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना सहकारातील दीपस्तंभ म्हणून ओळखला जातो. १९७७ मध्ये नोंदणी मिळालेला कारखाना १९८० मध्ये त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सुरू झाला. त्यावेळी कार्यक्षेत्रात फक्त चाळीस हजार टन ऊस उपलब्ध होता. आज कारखान्याने दहा लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे.
केवळ ऊस गाळप करणे, साखर विकणे व शेतकऱ्यांना त्याचे पैसे देणे या पारंपरिक साखर कारखानदारीच्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन शाहू साखर कारखान्यांने शेतकऱ्यांसाठी विविध सोयी-सवलती राबविल्या. साखर उद्योगातील आधुनिकीकरणाचा स्विकार ''शाहू''मध्ये नेहमीच सर्वप्रथम केला आहे. संगणकीय कार्यप्रणाली, सभासदांसाठी स्मार्टकार्ड व शाहू साखर अॅप, कमी उत्पादन गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन, उधारीवर साधनसामग्री पुरवणे व त्यासाठी अनुदान देणे हे उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवले जात आहेत, कारखाना मिलमध्ये डिस्टीलरी, को - जनरेशन, बायोगॅस निर्मिती प्लांट यशस्वीपणे उभारले आहेत. गतवर्षीच्या पहिल्या दिवसापासून उसाच्या थेट रसापासून इथेनॉल निर्मिती ''शाहू''मध्ये केली जात आहे. भविष्यात डिस्टीलरी व कारखाना गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे. सीएनजी गॅस निर्मिती करून स्वतःचा पंपसुद्धा उभारण्यात येणार आहे. शाहू पोटॕश खतनिर्मितीचा संकल्प आहे. कारखान्यास आजअखेर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ६७ पुरस्कार मिळाले आहेत. अपवाद वगळता सर्व निवडणुका बिनविरोध आहेत .
- समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष, शाहू ग्रुप.

------------

आसुर्ल-पोर्लेचा भाग्यविधाता ‘दालमिया’

पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखान्याच्या माध्यमातून आसुर्ल-पोर्ले परिसरात आर्थिक विकासाला गती आली असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे युनिट हेड एस.रंगाप्रसाद यांनी केले. ते म्हणाले, ‘दालमियाने दत्त कारखाना घेतल्यापासून गाळपास येणाऱ्या ऊसाला योग्य भाव दिला गेला असून तो वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. ही परंपरा कंपनी सुरवातीपासून कायम राखत आलेली आहे. तसेच गाळप क्षमता वाढवली असल्याने दैनंदिन आठ हजार मॅट्रिक टन गाळप होत आहे. त्यामुळे परीसरातील उसाची वेळेवर तोडणी होत आहे. कारखान्यामार्फत ऊस विकासाचे अनेक प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत. यामध्ये खते, तणनाशके, फवारणीचे पंप, सुधारित ऊस बियाणे, आदी सवलतीत पूरवठा केला जात आहे.तसेच ऊस विकासासाठी अनेक तज्ञ लोकांचे परिसंवादाचे आयोजन करण्यात येते. एस.रंगाप्रसाद म्हणाले, कंपनीने को-जन व डिस्टलरी प्रकल्प कार्यान्वित केल्यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळाली आहे. तसेच भागाचा सर्वांगीण विकास आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. तरी कारखान्याचे यंदाचे गाळप उद्दिष्ट पूर्ण कळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस दत्त दालमिया कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले आहे.
८३२५४
- युनिट हेड एस. रंगाप्रसाद

--------

राधानगरीत कृषी उद्योगाला ‘सह्याद्री’चे बळ
राधानगरी हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रचंड जलसाठा असणारा ( डी. +) तालुका आहे. बारमाही पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यामध्ये १०००० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरती ऊस पीक घेतले जाते तथापि कोणताही उद्योग नसलेला हा जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे. तालुक्यामध्ये उद्योग नसलेने शेतकरी व कष्टकरी जनता आर्थिक दृष्ट्या मागास आहे. राधानगरी तालुक्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पहिलाच कृषी उद्योग उभारणार आहे. आर्थिक विकासाचा स्त्रोत म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडे सर्व सामान्य जनता सकारात्मक पाहत आहे. याचे भान ठेवून या कारखान्याची उभारणी यशस्वीपणे होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे सातत्याने कार्यरत रहावा यासाठी साखर कारखान्याचे चेअरमन सदाशिवराव तथा बाळासाहेब आण्णासाहेब नवणे व सर्व संचालक मंडळाचे प्रयत्न आहेत.
८३२६०
- सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि., इंदुमतीनगर , धामोड , ता. राधानगरी, जि.कोल्हापूर
चेअरमन बाळासाहेब नवणे
-------

सहकारातील पर्यावरण दूत जवाहर कारखाना
व्यावसायिक व्यवस्थापन आणि सहकार, संस्कृती यांचा स्वीकार करुन कृषी, तांत्रिक आणि आर्थिक आघाडीवर उत्कष्ट कामकाज करणारा कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून ओळखला जातो. कारखान्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमता १६ हजार टन असून सहवीज निर्मिती प्रकल्पातून २७ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र व कर्नाटकमधील २२३ गावांचा समावेश आहे. कारखान्याने आधुनिकतेचा अवलंब केला असून महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे सुमारे ४० ऊस तोडणी मशिन चालु हंगामात कारखान्याकडे कार्यरत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी कारखान्याने नेहमीच पाऊल पुढे टाकले. कारखान्याच्या मोकळ्या जागेवर तब्बल ६२ हजार वृक्षांची लागवड करुन त्याची जोपासना केली आहे. सभासद व कामगारांना विविध कारणास्तव, वैद्यकीय उपचारासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीवेळी कारखान्याने स्वनिधीतून भरीव आर्थिक मदत केली आहे. दैनंदिन दहा हजार टन व त्यावरील ऊस गाळप क्षमता असलेल्या देशातील कारखान्यांपैकी या कारखान्याने ३२ टक्केपेक्षा कमी वाफेचा वापर करुन साखर उत्पादन केली आहे. ११ टक्के बगॅसची बचत केली आहे. कोणाचीही थकबाकी नसलेला हा कारखाना आहे. आतापर्यंत सर्व ७ पंचवार्षिक निवडणूका बिनविरोध पार पडल्या आहेत. कारखान्याच्या या दैदिप्यमान कामगिरीची नोंद घेवून राष्ट्रीय व राज्यस्तरीय नामांकीत विविध संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.
८३२५८
- कल्लाप्पाण्णा आवाडे - चेअरमन
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी

------------

पाणी पुनर्वापरातील आदर्श ‘डी. वाय.’
गगनबावड्यासारख्या दुर्गम व डोंगराळ भागात अत्यंत कठीण परिस्थितीत साखर कारखान्याची उभारणी केली. गाळप क्षमता प्रतिदिन २५०० टनावरुन ५००० मे. टन झाली आहे. २० मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती व ४३ के.एल.पी.डी.चा डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित आहे. एक वर्षातच या प्रकल्पाची क्षमता १०० केएलपीडी करण्याचे काम सुरू झाले आहे. वेळोवेळी एनर्जी ऑडीट करुन आवश्यक त्या ‍ठिकाणी व्हीएफडी पॅनल्स, अत्याधुनिक गिअरबॉक्सचा वापर करुन विजेच्या वापरात मोठ्या प्रमाणात बचत करुन विज वापर २१ युनिट्स प्रतिटन गाळप इथवर आणला आहे. कन्डेन्सेट प्रक्रिया करुन प्रोसेसकरीता लागणारे सर्वच पाणी पुर्नवापर (रिसायकल) करत आहोत. तसेच पंपाची लिकेज, अनावश्यक पाणी वापर, ओव्हरफ्लो इ. बाबींवर नियंत्रण ठेवून कारखान्यातून निर्माण होणारे इफ्लूएंट २०० क्युबीक मीटर वरुन ६० क्युबीक मीटर प्रतिदिन इतके कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचेकडून कारखान्यास दोन वेळा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता तर एक वेळा राज्यस्तरीय उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार प्राप्त झालेला आहे."
- आमदार सतेज पाटील,
अध्यक्ष, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना लि., ज्ञानशांतीनगर, असळज, ता. गगनबावडा, जि.कोल्हापूर
-------------

‘गुरुदत्त’ची रोज १६ लाख लिटर पाण्याची बचत
''गुरुदत्त शुगर्स'' मध्ये सातत्याने नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून साखर उद्योगातील बदलती आव्हाने स्वीकारली जात आहेत. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कारखान्याने वेळोवेळी बदल स्वीकारले आहेत. यातून शेतकऱ्यांचे हित साधले जाऊन कारखान्याचा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. दैनंदिन ५५०० टन गाळपाची किमया कारखान्याने साधली आहे. शिवाय चिमणीवाटे जाणारा धूर प्रदूषण निर्माण करतो. प्रदूषण कमी करण्यासाठी बगॅस ड्रायर सिस्टीमच्या माध्यमातून प्रदर्शन कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. २३ मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेचा सहवीज प्रकल्प सुरू आहे. यातून स्वतःच्या विजेची गरज भागवले जाते. उर्वरित वीज विद्युत महामंडळाला विक्री केली जाते. तसेच ऊस गळपाच्या प्रक्रियेत ऊसातील पाणी बाष्पीभवनातून निघून जात असते. ते रोखून दररोज १६ लाख लिटर पाण्याची निर्मिती आणि बचत केली जाते. ऊस विकास योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. क्षारपड जमीन सुधारण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प कारखाने राबवला आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस योजनाही सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच सामाजिक कार्यातदेखील कारखाना अग्रेसर असतो. येणाऱ्या काळात नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कारखान्याचा लौकिक वाढविण्याचा प्रयत्न करू.
- माधवराव घाटगे
(अध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, संचालक इस्मा)


-----------
‘श्री दत्त इंडिया’चे नियोजनाला प्राधान्य
राज्य, देशातील साखर कारखान्यांच्या हंगामासमोरील आव्हानांची ‘सकाळ’ माध्यम समूहा च्यावतीने आयोजित शुगर कॉनक्लेव्हमध्ये चर्चा अपेक्षीत आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठी एकरी उत्पादनवाढीसह उतारा, साखर दर, इथेनॉल, लिकर उत्पादन, वीजनिर्मिती बरोबरच किमान साखर कारखाने १६० दिवस सुरु राहिले पाहिजेत. साखर विक्री, निर्यात, निर्यातीतील राज्यनिहाय कोटा, दरातील घसरणीवर चर्चा झाली, तरच साखर कारखानदारीला बळ मिळेल. कारखान्यांचे हंगाम कमी चालले तर कामगारांना वर्षाचा पगार देणे अशक्य होईल. कमी दिवस कारखाना हंगाम सुरु राहिला तर नाईलाज म्हणून कंत्राटी पध्दतीने कामे करुन घ्यावी लागतील. कायम कामगारांना पगार देणे शक्य होणार नाही. सोलापूर जिल्ह्यात ५०-६० दिवसात गाळप बंद करावे लागते. तशी स्थिती अन्य जिल्ह्यातही येवू शकते. धोके ओळखून नियोजनाला प्राधान्य दिले पाहिजे.
- शरद मोरे, जनरल मॅनेजर
श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमीटेड, सांगली ( फोटौ अजून नाही.)
------------------
nip1524
83017
उगार साखर कारखाना.

उगार परिसराचा आधारवड
उगार खुर्द (जि. बेळगाव) येथील उगार साखर कारखाना स्थापन होऊन ८३ वर्षे झाली. सध्या कारखान्याचा ८१ वा ऊस गळीत हंगाम सुरु आहे. शिरगावकर परिवाराने कठोर परिश्रम घेऊन कारखान्याच्या माध्यमातून परिसरात औद्योगिक व हरीतक्रांती केली आहे. यामुळे या कारखान्यास दीपस्तंभ मानण्यात येते. सध्या शिरगावकर परिवारातील चौथी पिढी कारखान्याचे कामकाज पाहत आहे.
प्रारंभीच्या काळात गाळप क्षमता ५०० टन होती. आता १८ हजार टन प्रतिदिन गाळप सुरू आहे. कारखान्याने १९६२ मध्ये डिस्टिलरी उभारली आहे.१९९६ मध्ये ४४ मे. वॅटचा सहवीज प्रकल्प उभारला असून तो राज्यातील सर्वाधिक क्षमतेचा आहे. २०२१ मध्ये ८४५ के.एल.पी.डी. इथेनॉल प्रकल्प सुरु केला आहे. हा देशातील जास्त क्षमतेच्या प्रकल्पांपैकी एक आहे. १९४६-९७ मध्ये साखर उतारा१३.४६ इतका होता. तो देशात पहिला आला. तर १९९२-९३ मध्ये १२.७४ उतारा देशात दुसरा आला होता. २०२१-२२ मध्ये २३,०९,४५३ टन उसाचे गाळप होऊन २६,३२,००० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. कारखान्याचा हा गाळप व उत्पादनाचा विक्रम आहे. १९९६ ते २००० या वर्षात जास्तीतजास्त वीजनिर्मिती केल्याबद्दल राज्य वीज खात्याने कारखान्यास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला होता. उत्कृष्ट मद्य निर्मितीबद्दल शासनाने आय. एस. आय. पुरस्कार दिला होता. तर ऊस संशोधन व विकास कार्याबद्दल आठ वेळा एस. व्ही. पार्थसारथी पारितोषिक मिळाले. राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कारही मिळाला आहे. पुणे येथे दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनात (१८ सप्टेंबर २०२२) माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी उगार कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगावकर यांना कर्नाटकामधील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केला.

फोटो ः nip1523
83016
पुणे येथे ‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने सहकार महापरिषद होत असून हा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमामुळे साखर उद्योगाबद्दल मंथन होईल. त्याशिवाय कारखानदारांच्या भेटीगाठी होऊन या उद्योगातील वाढीबद्दल व समस्यांबद्दल चर्चा होऊन आवश्यक कार्यवाही करण्याची दिशा मिळेल. उगार साखर कारखाना ८३ वर्षे शेतकरी सभासद, कामगारांचे हित जोपासत वाटचाल सुरू ठेवली आहे.
-चंदन शिरगावकर, व्यवस्थापकीय संचालक उगार शुगर्स (जि. बेळगाव)

---------
दुष्काळी पट्टयातील ‘ग्रीन पॉवर’

ग्रीन पॉवर शुगर्सची उभारणी ही सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोपुज येथे दुष्काळी पट्टयात केलेली आहे. दुष्काळी पट्टयात शेतकरी केंद्रबिंदू मानून आर्थिक व औद्योगिक क्रांती करण्याचे स्वप्न स्व. आमदार देशमुख यांनी पाहिले होते. त्यामुळे येथे साखर कारखाना उभारुन संपतरावअण्णांची स्वप्नपूर्ती केली आहे.
कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ३५०० मेट्रिक टन आहे. त्याचबरोबर कारखान्याने उपपदार्थ निर्मिती प्रकल्पही सुरु केलेले आहेत. त्यामध्ये सहवीज निर्मिती,इथेनॉल, डिस्टीलरी आदींचा समावेश आहे.तर येथील उसाच्या वाढत्या क्षेत्राचा विचार करता भविष्यात कारखान्याची गाळप क्षमता यासह उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचीही क्षमता वाढवण्याच्या विचार आहे. त्याचबरोबर कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक यांनाही विक्रमी ऊस उत्पादन घेणेविषयी कारखान्या मार्फत आधुनिक तंत्रज्ञान देवून मार्गदर्शन केले जाणार आहे.
दै.''सकाळ''ने सहकार महापरिषद घेतल्याने साखर उद्योगातील जागतिक धोरण व नवे तंत्रज्ञानविषयी सखोल व अभ्यासपूर्ण माहिती मिळण्यास मदत झाली आहे. भविष्यात साखर कारखान्यांना कोणत्या दिशेने, कशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे व काय बदल केले पाहिजेत याबाबत सखोल ज्ञान मिळाले.
03918
- संग्रामसिंह देशमुख, मुख्य प्रवर्तक
ग्रीन पॉवर शुगर्स लि. गोपूज,ता.खटाव,जि. सातारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com