महाराष्ट्र हायस्कूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र हायस्कूल
महाराष्ट्र हायस्कूल

महाराष्ट्र हायस्कूल

sakal_logo
By

83299
कोल्हापूर : महाराष्ट्र हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांचा सत्कार करताना मान्यवर.


महाराष्ट्र हायस्कूलमध्ये
वार्षिक पारितोषिक वितरण
कोल्हापूर, ता. २० : महाराष्ट्र हायस्कूलने ६३ वर्षे ज्ञानार्जनाची यशस्वी परंपरा अखंडपणे सुरू ठेवली, असे प्रतिपादन सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी केले. येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा झाला, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील होते. कार्यक्रमात राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, शाळांतर्गत व शाळाबाह्य क्रीडा स्पर्धा व दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
प्राचार्य डॉ. जी. पी. माळी म्हणाले, ‘‘क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र हायस्कूलने केलेली प्रगती कोल्हापूरला भूषणावह आहे.’’ प्राचार्य एस. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्था परिचय संचालक विनय पाटील केला. उपप्राचार्य यू. आर. अतकिरे यांनी अहवाल वाचन केले. व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण, संचालक पी. के. पाटील, आर. डी. पाटील, सविता पाटील, सी. एम. गायकवाड, पर्यवेक्षक जे. पी. कांबळे, एस. ए. जाधव, माजी प्राचार्य व्ही. बी. लोहार, ए. एस. रामाणे, माळकर आदी उपस्थित होते. एस. एस. मोरे, आर. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उदय पाटील यांनी आभार मानले.