कोल्हापर मावळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापर मावळा
कोल्हापर मावळा

कोल्हापर मावळा

sakal_logo
By

83313
कोल्हापूर : शिव जयंतीनिमित्त मिरजकर तिकटी येथील मावळा ग्रुपच्या किल्ला प्रतिकृतीचे उद्‍घाटन करताना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती. शेजारी उमेश पोवार, आर. डी. पाटील, शिवराज नाईकवडे, धैर्यशील यादव, डॉ. विजय गावडे, संदीप चव्हाण, सुरेश देसाई, निवास शिंदे, दिगंबर लोहार, प्रवीण सोनवणे आदी.

मावळा कोल्हापूरचा शिवजयंती उत्सव सुरू
किल्ला प्रतिकृती लक्षवेधी; मालोजीराजे छत्रपतींच्या हस्ते उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : छत्रपती शिवाजी महाराज की जय... या जयघोषात मिरजकर तिकटी येथील मावळा कोल्हापूरच्या शिवाजी जयंती उत्सवात सुरवात झाली. आज माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून उत्सवातील किल्ला देखावा खुला झाला. विद्युत रोषणाई व आतषबाजीने आसमंतही दुमदुमून गेला.
मंगळवारपेठेतील कार्यकर्त्यांच्या सहभागाने मावळा कोल्हापूर संस्थेतर्फे यंदाचा शिवजयंती उत्सव थाटमाटात साजरा होत आहे. मिरजकर तिकटी किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारली आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा प्रतिष्ठापित केली आहे. येथे मालोजीराजे यांच्या हस्ते उद्‍घाटन होताच आतषबाजी सुरू झाली.
या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे देदीप्यमान कार्य, स्वराज्य रक्षण, शौर्याची प्रेरणा देणारा देखावा यंदाच्या उत्सवाचा मनोवेधक आहे. हा देखावा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग उडाली.
मावळा कोल्हापूरचे अध्यक्ष उमेश पोवार, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, धैर्यशील यादव, डॉ. विजय गावडे, संदीप चव्हाण, सुरेश देसाई, निवास शिंदे, दिगंबर लोहार, प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते.
------------------
चौकट
उत्सवानिमित्त कार्यक्रम असे
ता. १७ : मावळा कोल्हापूर पुरस्कार वितरण डॉ. आ. ह. साळुंखे यांना प्रदान होणार.
ता.१८ : महानाट्य सादरीकरण प्रतापगडचा शिवसंग्राम मोफत
ता. १९ : शिवजन्मोत्सव सोहळा (आमदार जयश्री जाधव, मधूरिमाराजे छत्रपती प्रमुख उपस्थिती)
महानाट्य सादरीकरण प्रतापगडचा शिवसंग्राम मोफत आरोग्य शिबिर. (डॉ. सोनलकुमार कदम, डॉ. राजेंद्र चिंचणेकर आदींची उपस्थिती)