अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी वितरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी वितरीत
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी वितरीत

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी वितरीत

sakal_logo
By

gad175.jpg
83428
गडहिंग्लज : शहरातील बचत गटातील महिलांना बीज भांडवल निधीचे वितरण झाले. यावेळी स्वरुप खारगे, जयवंत वरपे, संदीपकुमार कुपटे व लाभार्थी उपस्थित होते.
-----------------------------------------------
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी वितरित

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : येथील पालिकेकडील दिव्यांग अंत्योदय योजना, नागरी उपजीविका अभियानातर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत शहरातील नोंदणीकृत पाच महिला बचत गटातील १७ महिलांना प्रत्येकी ४० हजारांप्रमाणे ६ लाख ८० हजारांचा बीज भांडवल निधी वितरित झाला. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्याहस्ते वाटप झाले.
केंद्रातर्फे आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत राबवली जाणारी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सध्या कार्यरत असलेल्यांना नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. योजनेत पारंपरिक, स्थानिक उत्पादनाबरोबरच नाशवंत फळ पिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य, गूळ उत्पादने, दुग्ध व पशुउत्पादनांचा समावेश आहे. अशा उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य, महिला गट व फेडरेशनला लहान मशिनरीसाठी प्रत्येकी ४० हजार, तर स्वयंसहायता गटासाठी कमाल ४ लाख रुपये देण्यात येतात. शहरातील अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित लाभार्थींनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. खारगे यांनी केले. कार्यक्रमास पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक श्‍वेता सुर्वे, सहायक प्रकल्पाधिकारी जयवंत वरपे, समुदाय संघटक संदीपकुमार कुपटे, सीआरपी विद्या कांबळे, मीनाक्षी मोळदी आदी उपस्थित होते.