Sat, April 1, 2023

जिजस् डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीजच्या वर्धापन दिन
जिजस् डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीजच्या वर्धापन दिन
Published on : 19 February 2023, 11:24 am
83496
जिजस् डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीजचा वर्धापन
कोल्हापूर ः येथील जिजस् डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीजच्या वर्धापनदिनानिमित्त एस्तर्न पॅटर्न कंपौंडच्या परिसरात गोरगरीब, गरजू, विधवा, परितक्त्या, अंध आणि अपंगांना गहू, तांदूळ, साखर, तिखट, मीठ, डाळी, तेलासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संस्थापक-अध्यक्ष, ब्रदर मरेन जोसेफ यांनी जगाच्या कल्याणासाठी आणि शांतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांचे ब्रदर मरेन जोसेफ यांनी स्वागत केले. त्यांच्या हस्ते शंभरहून अधिक गरजूंना अन्नधान्य असलेले प्रत्येकी २५ किलोचे किट देण्यात आले. अरुण केसरकर, सुसीना जोसेफ, संग्राम साठे, विनोद सातपुते, अलिशा पाटोळे, शांताकुमारी, शुभांगी केसरकर, पूनम साठे, रुपाली सातपुते, नयन पाटोळे उपस्थित होते.