कौशल्य विकास संधी- भाग तीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौशल्य विकास संधी- भाग तीन
कौशल्य विकास संधी- भाग तीन

कौशल्य विकास संधी- भाग तीन

sakal_logo
By

मालिका लोगो- कौशल्य विकासाच्या संधी- भाग तीन
--

दोन वर्षांत ३७ हजार जणांची नोंदणी
अजूनही अडीच लाखांवर उमेदवारांना हवी नोकरी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः दोन वर्षांत नोकरीसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्याही वाढली असून ३७ हजार ९२ इतक्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परस्पर नोकरीस लागलेल्यांची संख्या पंचवीस हजार २३२ इतकी असून, अजूनही दोन लाख ६६ हजार ६३३ उमेदवार नोकरीसाठी वेटींग लिस्टवर आहेत. त्यामध्ये एक लाख ८६ हजार ३९१ पुरुष उमेदवारांचा, तर ८० हजार २४२ महिला उमेदवारांचा समावेश आहे; मात्र यांपैकी किमान पंचवीस टक्के उमेदवार कुठेना कुठे नोकरी करत असले तरी त्यांनी आणखी चांगल्या नोकरीसाठी नोंदणी तशीच ठेवली आहे.

औद्योगिक कामगारांची वानवा
जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात औद्योगिक कामगारांची मागणी मोठी आहे. त्यासाठी विविध औद्योगिक आस्थापनांकडून वारंवार कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे मागणी पत्रे येतात. त्यानुसार मेळावेही होतात; मात्र कुशल औद्योगिक कामगार मिळत नसल्याचे चित्र आहे. चालू वर्षाचाच विचार केला तर जानेवारीपर्यंत एकूण १४ मेळावे झाले. विविध आस्थापनांतील एकूण १३ हजार ७४९ रिक्त पदे भरण्यासाठी हे मेळावे घेतले गेले; मात्र प्रत्यक्षात पाच हजार ८४५ उमेदवारांनी त्याचा लाभ घेतला आणि त्यातून ७६२ जणांचीच अंतिम निवड झाली. अनेक उमेदवार एकदा नोंदणी केली की, पुन्हा तिकडे पाहतच नाहीत. त्यांनी नोंदणीनंतरही जे जे अभ्यासक्रम किंवा पदवी-पदविका घेतल्या त्याची माहिती ऑनलाईन अपडेट केली तर ही मागणी पूर्ण करता येणे शक्य आहे.

आधार, मोबाईल लिंक आवश्यकच
महास्वयंम पोर्टलवर एम्प्लॉयमेंट कार्डची नोंदणी केली आहे व आधारकार्ड नंबर व ईमेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी आधारकार्ड नंबर, ईमेल, मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक असते; मात्र त्याबाबत अजूनही अनेक उमेदवारांचे दुर्लक्ष आहे. माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील रोजगार हा पर्याय निवडून ही माहिती अद्ययावत करावयची आहे. अधिक माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या विचारेमाळ, कावळा नाका येथील कार्यालयात उपलब्ध आहे.
(समाप्त)

चौकट
दृष्टिक्षेपात...
वर्ष*नोंदणी केलेले पुरुष उमेदवार*महिला उमेदवार*एकूण*परस्पर नोकरीस लागलेले उमेदवार
२०२१*१२, ५७२*४,४७२*१७, ०४४*१०,१९४
२०२२*१४, २०४*६, २४४*२०, ४४८*१५, ०३८.