
युवकाची आत्महत्या
L83542 : अभिषेक गवळी
--------------
हेब्बाळमधील युवकाची आत्महत्या
गडहिंग्लज, ता. १७ : हेब्बाळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील अभिषेक आप्पाण्णा गवळी (वय १९) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
अभिषेक हा एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ई अॅण्ड टीसी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत आहे. आज सकाळी तो अभ्यास करतो, असे सांगून घराच्या माळ्यावर गेला. वडील शेताकडे पाणी पाजण्यासाठी गेले, तर आईसुद्धा कामानिमित्त बाहेर गेली होती. आई घरी आल्यावर चहा पिण्यासाठी म्हणून ती अभिषेकला बोलवायला माळ्यावर गेली. त्या वेळी अभिषेक तुळईला दोरीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. तिने आरडाओरड केल्याने नातेवाईक व शेजारी गोळा झाले. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणले. तत्पूर्वीच, तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अभिषेकच्या मागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.