सुमंगलम- अग्नि | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुमंगलम- अग्नि
सुमंगलम- अग्नि

सुमंगलम- अग्नि

sakal_logo
By

फोटो-83808
-
लोगो-
अग्नितत्त्व
डॉ. अशोक वाली

ऊर्जेच्या अतिवापरातून
बिघडले संतुलन

सृष्टीची व मानवाची उत्पत्ती ही पंचमहाभूतांपासूनच झाली आहे. पंचमहाभूतांची उत्पत्ती ही आकाश महाभूतापासून तर त्यांचा लय हा पृथ्वी महाभूतापासून होतो. आकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वी हा या महाभूतांचा क्रम आहे. अग्नि महाभूत मध्यभागी आहे. कारण अग्नि महाभूताला जर आकाश व वायूची साथ मिळाली तर अग्नि वाढतो आणि जल व पृथ्वी या महाभूतांची साथ मिळाली की अग्नि कमी होतो. त्यामुळे सृष्टी व मानवाच्या दृष्टीने अग्नि महाभूत हे पाकृत असणे महत्त्वाचे आहे. अग्निमुळे शरीरात पाचन होत असते म्हणजे परिवर्तन होत असते. अग्निशिवाय परिवर्तन शक्य नाही. सध्या अग्नि म्हणजे ऊर्जा हा जीवनातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे.
सुरुवातीला तप्त असणाऱ्या पृथ्वीवर वाफ तयार होऊन त्याचे पाण्यात रूपांतर झाले. त्यानंतर जीवसृष्टी निर्माण झाली. त्यावेळी वीज पडणे ही नैसर्गिक क्रिया होत होती. अशावेळी गारगोटीच्या माध्यमाने किंवा अग्निमंथ या वनस्पतींची लाकडे एकमेकांवर जोरात घासून घर्षणाने अग्निची निर्मिती केली. त्यावेळी त्याची दाहकता कळाली. पुढे एकदा अग्नि निर्माण केला की तो तसाच ठेवण्यासाठी अग्निकुंड तयार केले. या अग्निकुंडातून अग्नि घेऊन जाऊन दुसरीकडे अग्निचा उपयोग होऊ लागला. पुढे या अग्निचा उपयोग दैनंदिन व्यवहारात होऊ लागला. सुरुवातीला रात्रीच्या वेळी दिवट्या, मशाली पेटवित. युद्धाच्या वेळी त्याचा उपयोग होत असे. त्याशिवाय अन्न शिजवण्यासाठी चूल तयार करून तिथे अग्निचा उपयोग होऊ लागला. पाणी तापवणे, प्रकाशासाठी, देवपूजेसाठी पणत्या लावणे, रात्री कंदील लावणे, थंडीमध्ये शेकोटी पेटवणे, बाळंतिणीला शेक देण्यासाठी अशा पद्धतीने अग्निचा वापर वाढला. नैसर्गिक उष्णतेचा धान्य वाळवणे, कपडे वाळवणे आदी कारणांसाठी अतिवापर होऊ लागला. पूर्वी पंजाबमध्ये एकत्र चुल्हा तयार करून त्यावर सर्व गावकरी आपापली रोटी भाजून घेत. लाकूड, कोळसा, तेल या पारंपरिक ऊर्जेचा उपयोग तसेच जलविद्युत, वायू विद्युत, औष्णिक विद्युत अशा अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग विविध कारणांसाठी हळूहळू वाढला. जैविक ऊर्जेमध्ये बायोगॅसचा उपयोग वाढला. पूर्वी बैलांचा वापर करून ऊर्जा तयार करून गिरणी चालवत. अशा सर्व प्रकारच्या ऊर्जेचा अतिवापर वाढतच राहिला. शेतीवरील, विजेवरील व सोलरवरील पंप त्याशिवाय रेल्वेसाठी, विमानासाठी, कारखान्यासाठी ऊर्जेचा वापर होतो. इंधन साठवून त्याचा वापरही वाहनांसाठी आणि विविध कारणांसाठी होतो. मात्र, त्याचाही अतिवापर झाला आहे आणि म्हणूनच अग्नितत्त्वाचे संतुलन बिघडले आहे.

हे करावेच लागेल...
- सौरऊर्जेचा वापर अधिक व्हायला हवा
- गरज नसताना टीव्ही, फॅन, विजेचे बल्ब, ट्यूब चालू ठेवणे बंद करावे
- घरातील वाहनांची संख्या मर्यादित हवी. सायकलसारख्या पर्यायांवर अधिक भर हवा
- सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्वांनी आग्रह धरावा
- वातानुकुलित यंत्रणेचा वापरही मर्यादितच हवा