अमित शहा रंगीत तालीम आणि बंदोबस्त वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहा रंगीत तालीम आणि बंदोबस्त वाटप
अमित शहा रंगीत तालीम आणि बंदोबस्त वाटप

अमित शहा रंगीत तालीम आणि बंदोबस्त वाटप

sakal_logo
By

फोटो - 83586, 83677
----------------------

गृहमंत्री शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर
शहराला पोलिस छावणीचे स्वरूप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी दसरा चौकात ठाण मांडून बसले आहेत. बंदोबस्‍तासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथून आलेल्या पोलिसांना आज सकाळी पोलिस मुख्‍यालयातील मैदानावर बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी शहांच्या दौरा मार्गावर वाहनांच्या ताफ्यांची रंगीत तालीमही घेण्यात आली. उद्या (ता. १९) ड्रोनद्वारे कोठेही चित्रीकरण करता येणार नाही.
सायंकाळी पाचच्या सुमारास विमानतळापासून ते नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयापर्यंत विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वाहनांच्या ताफ्यासह रंगीत तालीम घेतली. दिल्लीतील दहशतवादविरोधी पथकासह इतर पथकांनी शहरातील बंदोबस्तावर नजर ठेवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही कोल्‍हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे नियोजन करणारे मुंबईचे एक पथकही कोल्हापुरात दाखल झाले. शहरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रासह मंत्री शहांच्या स्वागताचे पोस्टर आता झळकले आहेत.
---------
अपार्टमेंटमधील नागरिकांना
आधारकार्ड जमा करण्याचे आदेश
नागाळा पार्क परिसरात भाजपचे कार्यालय आहे. तेथे मंत्री शहा येतील. त्यामुळे तेथील अपार्टमेंटमधील नागरिकांचे आधारकार्ड शाहूपुरी पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश शाहूपुरी पोलिस निरीक्षकांनी काढले आहेत. मंत्री शहांच्या दौऱ्यावेळी घरातून विनाकारण बाहेर पडायचे नाही. चालत अथवा वाहनातून विनाकारण ये-जा करायचे नाही, असेही लेखी पत्र अपार्टमेंटच्या अध्यक्षांना पाठविले आहे. दरम्यान, विमानतळ ते अंबाबाई मंदिर, छत्रपती शिवाजी चौक, दसरा चौक, पंचशील हॉटेल, पेटाळा आणि नागाळा पार्क येथे मंत्री शहा जाणार आहेत. त्यामुळे या सर्वच ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.
---------