गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातमी
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातमी

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातमी

sakal_logo
By

८३७३८
कौलगे : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कलाप्पाण्णा नडगदल्ली सभागृहाच्या उद्‍घाटनप्रसंगी महादेव केसरकर, काशीनाथ शिंदे, नानाप्पा माळगी, भाऊसाहेब कांबळे, संजय पोवार, एस. एस. इनामदार उपस्थित होते.

कौलगे शाळेत सभागृहाचे उद्‍घाटन
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कलाप्पाण्णा नडगदल्ली सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्‍घाटन ग्रामपंचायतीचे माजी सदस्य महादेव ऊर्फ पिंटू केसरकर व काशीनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. शिक्षणप्रसारक मंडळाचे सचिव नानाप्पा माळगी यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच भाऊसाहेब कांबळे, उपसरपंच संजय पोवार, मनोहर पाटील, शीतल पाटील, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. इनामदार, स्वाती पाटील, बळीराम पाटील, दीपक सावंत, सुरेखा नंदनवाडे, विश्‍वजित चव्हाण, नामदेव यादव, सुनील माने, बाळासाहेब मोहिते, दुंडाप्पा कांबळे, गजानन काटकर आदी उपस्थित होते.
----------------
साई मूकबधिरच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील साई मूकबधिर निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविले. कर्णबधिर प्रवर्गात अनुज हटकर याने २०० मीटर धावणे प्रकारात तिसरा, तर वैभव कोळी याने लांबउडीत तिसरा क्रमांक मिळविला. क्रीडाशिक्षक दत्तात्रय कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे, मुख्याध्यापिका सरिता रजपूत, साधना कांबळे यांनी अभिनंदन केले.
------------
८३७३९
करंबळी : महालक्ष्मी पतसंस्थेतर्फे अग्निवीरांच्या सत्कारप्रसंगी नारायण शेडेकर, पुंडलिक माळी, अॅड. विकास पाटील, शिवाजी पन्हाळकर उपस्थित होते.

करंबळीत अग्निवीरांचा सत्कार
गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून भरती झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. टेक्निकल विभागात भरती झाल्याबद्दल सुयोग पोवार, जीडी पदावर निवड झाल्याबद्दल संकेत खंडागळे याचा संस्थेचे माजी अध्यक्ष नारायण शेडेकर व बाळनाथ दूध संस्थेचे माजी अध्यक्ष पुंडलिक माळी यांच्या हस्ते सत्कार झाला. संस्थेचे संस्थापक अॅड. विकास पाटील, अध्यक्ष शिवाजी पन्हाळकर, बाळकू चौगुले, सुरेश धुमाळ, शिवाजी पोवार, संजय सुतार, अक्षय सलपे, धोंडिबा भोईटे, राजेंद्र मिसाळ आदी उपस्थित होते. सुरेश मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. नामदेव यादव यांनी सूत्रसंचालन केले. शंकर पाटील यांनी आभार मानले.
------------
ओंकार महाविद्यालयात आरोग्य शिबिर
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात आरोग्य शिबिर झाले. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. पद्मजा देसाई, महादेवी कांबळे, साक्षी कांबळे यांनी हिमोग्लोबीनसह अन्य शारीरिक तपासण्या केल्या. ७५ विद्यार्थ्यांची तपासणी झाली. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण, प्रा. कविता पोळ, प्रा. स्नेहल ताडे, प्रा. क्रांती शिवणे, प्रा. शीतल डवरी आदी उपस्थित होते.
---------------
दुंडगेत बुधवारी स्पर्धा
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत हनुमान यात्रेनिमित्त रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केल्या आहेत. बुधवारी (ता.२२) सायंकाळी सहाला प्राथमिक शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होतील. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ७०००, ५०००, ३००० रुपयांचे बक्षीस आहे. इच्छुकांनी पवन नाईक, प्रभू नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.