विकास लगारे यांचा सत्कार

विकास लगारे यांचा सत्कार

ich193.jpg
83747
इचलकरंजी : नपा, मनपा कर्मचारी संघटना महासंघ कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल विकास लगारे यांचा सत्कार करण्यात आला.
विकास लगारे यांचा सत्कार
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य नगरपालिका, महानगरपालिका कर्मचारी संघटना महासंघाच्या उपाध्यक्षपदी येथील विकास लगारे यांची निवड केली. त्यानिमित्त जुनी नगरपरिषद फायर स्टेशन येथे इचलकरंजी महापालिका सर्व कर्मचारी संघटनांतर्फे त्यांचा सत्कार केला. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सुभाष मोरे, शंकर अगसर, धनंजय पळसुले, हरी माळी, संजय कांबळे आदी उपस्थीत होते. प्रास्ताविक रामचंद्र कोळेकर यांनी केले. तुषार हेगडे यांनी आभार मानले.
-----------
ich194.jpg
83748
इचलकरंजी ः मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना रवी रजपूते यांनी निवेदन सादर केले.
------------
वारसा हक्काचा प्रश्न लागणार मार्गी
इचलकरंजी ः महाराष्ट्रातल्या नगरपरिषद व महापालिकेतील सर्वच जातीतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा प्रलंबित प्रश्न पंधरा दिवसांत मार्गी लागेल, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी दिली. अधिनियम बदलल्यामुळे सात वर्षापासून हा प्रश्न प्रलंबीत आहे. याबाबत रजपूते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपसचिव वरखडकर, स्विय सहायक ओंकार सुर्वे आदींची प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. याबाबत सकारात्मक निर्णय घेवून हा प्रश्न पंधरा दिवसांत मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले. शिष्टमंडळात शामराव जावळे, अमित जावळे, अशोक कांबळे, अमोल कविशील, दादू हेगडे, मिलिंद कांबळे आदींचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com