Wed, March 22, 2023

बांधकाम कामगारांना साहित्य वाटप
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप
Published on : 21 February 2023, 11:38 am
ajr192.jpg
83840
किणे (ता. आजरा) ः येथे बांधकाम कामगारांना विष्णुपंत केसरकर, व्ही. जी. कातकर, विजय केसरकर आदींनी साहित्याचे वाटप केले.
----------
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप
आजराः किणे (ता. आजरा) येथे महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळातर्फे गावातील नोंदणीकृत २१० कामगारांना पेटी व अन्य साहित्याचे वाटप केले. माजी सभापती विष्णुपंत केसरकर अध्यक्षस्थानी होते. व्ही. जी. कातकर, उपसरपंच विजय केसरकर, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ बामणे, महेश पाटील, गुलाबी केसरकर, मनीषा केसरकर, अलका बामणे आदी प्रमुख उपस्थित होते. उपसरपंच विजय केसरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री. केसरकर, श्री. कातकर यांनी मार्गदर्शन केले. सतुराम घोळसे, राजाराम कांबळे, वसंत नाईक, श्रीकांत बामणे, संजय पाटील, मारुती बामणे आदी उपस्थित होते.