आजऱ्यातील रामतीर्थ यात्रा उत्साहात

आजऱ्यातील रामतीर्थ यात्रा उत्साहात

ajr195.jpg
83904
रामतीर्थ (ता. आजरा) ः येथील महादेव मंदिरात भाविकांची झालेली गर्दी. (छायाचित्र श्रीकांत देसाई, आजरा)

आजऱ्यातील रामतीर्थ यात्रा उत्साहात
महादेव मंदिरात पालखी सोहळा; राममंदिरात विविध कार्यक्रम
आजरा, ता. १९ ः आजऱ्यापासून दीड किमीवर असलेल्या रामतीर्थ या पवित्रस्थळावर यात्रा अमाप उत्साहात व शांततेत झाली. आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. आजरा, चंदगड, भुदरगड यासह सीमाभागातील हजारो भाविक रामतीर्थवर दाखल झाले होते. श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. महादेव मंदिरात पालखी सोहळा झाला. राम मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
आज पहाटे राममंदिरात काकड आरती झाली. राममंदिर व महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले. राममंदिर व महादेव मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. एसटी, खासगी वाहने व दुचाकीवरून भाविक यात्रास्थळी दाखल होत होते. आजरा आगाराने भाविकांसाठी खास एसटी बसच्या फेऱ्या सोडल्या होत्या. मेवा मिठाई, आईस्क्रीम, खेळण्याच्या दुकानासह विविध दुकानांमध्ये भाविकांची गर्दी होती. ‘श्रीराम जयराम जय जयरामचा’ गजर सुरु होता. आजरा नगरपंचायतीने यात्रास्थळावर भाविकांच्या सेवेसाठी स्वयंसेवक नेमले होते. आरोग्य विभागाचे पथक तैनात केले होते. पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला होता. आजऱ्यातील रवळनाथ मंदिरातून दुपारी तीन वाजता पालखी रामतीर्थाकडे निघाली. पालखीसोबत मानकरी होते. येथील तहसीलदार कार्यालयाजवळ आल्यावर तहसीलदार विकास अहिर यांच्याहस्ते पालखीचे पुजन झाले. नायब तहसीदार डी. डी. कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे आदी उपस्थित होते. रामतीर्थवरील महादेव मंदिरात पालखी सोहळा उत्साहात झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com