अमित शहांनी दिला ४५ दिवसांचा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहांनी दिला ४५ दिवसांचा कार्यक्रम
अमित शहांनी दिला ४५ दिवसांचा कार्यक्रम

अमित शहांनी दिला ४५ दिवसांचा कार्यक्रम

sakal_logo
By

अमित शहांनी दिला ४५ दिवसांचा कार्यक्रम
---
महिला, वंचित घटकांशी संपर्क वाढविण्याची सूचना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १९ ः ‘मतदारसंघातील महिला, वंचित घटक यांच्याशी संपर्क वाढवून पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोचवा. ‘मन की बात’ आणि ‘नमो ॲप’ याचा प्रसार करा,’ अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कार्यकर्त्यांना दिल्या. पक्षाच्या नवीन कार्यालयाच्या वास्तूमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना ४५ दिवसांचा कार्यक्रम दिला. ते म्हणाले, की केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा. लाभार्थ्यांची यादी करा, त्यांच्याशी संपर्क करा. मतदारसंघातील महिला, वंचित घटक यांच्यापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोचवा. शक्ती केंद्रांना प्रमुख नेमा, ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जाहीर प्रक्षेपण करा, तसेच नमो ॲप अधिकाधिक जणांपर्यंत पोचवा. प्राथमिक कृषी पतसंस्था मोठ्या प्रमाणात सुरू करा. हे सर्व पुढील ४५ दिवसांत करा. पुढील प्रवासात या सगळ्याचा आढावा मी घेईन.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, समरजितसिंह घाटगे, नाथाजी पाटील, महेश जाधव, अशोक देसाई, शौमिका महाडिक, गायत्री राऊत, विठ्ठल पाटील, गणेश देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------

प्रभावी नेत्यांना पक्षात आणा
जिल्ह्यात अन्य पक्षांतील जे प्रभावी आणि चांगले नेते, कार्यकर्ते आहेत, त्यांना भारतीय जनता पक्षात आणा, असेही अमित शहा यांनी या वेळी कार्यकर्त्यांना सांगितले.