तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन
तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन

तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन

sakal_logo
By

83977
कोल्हापूर ः माहिती-तंत्रज्ञान शिक्षक संघटनेच्या मागण्यांबाबत निवेदन देताना पदाधिकारी.

तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाइन
परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

कोल्हापूर ः महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती-तंत्रज्ञान शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य न केल्यास फेब्रुवारी-मार्चमध्ये तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाइन परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अध्यक्ष अतुल पाटील यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी राज्य मंडळ पुणेचे शरद गोसावी यांनी दिले आहे. तंत्रज्ञान विषय शिक्षक २० वर्षांपासून त्यांच्या हक्काचे वेतन प्राप्त करण्यासाठी झटत आहेत. उच्च माध्यमिक स्तरावरील माहिती-तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतनापोटी अनुदानाची तरतूद करण्याबाबत शासनाची माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार राज्यात ५९७ शिक्षक २१ वर्षांपासून सेवेत आहेत. त्यांच्या वेतनापेटी १० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या शिक्षकांना वेतन अनुदान मिळावे, त्यांची २००१-०२ पासूनची सेवा ग्राह्य धावी, आदी मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा मार्चमध्ये होणाऱ्या बारावी ऑनलाइन परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला. यावेळी विशाल शिंदे, नितीन राऊळवार, नंदू जाधव, संजय पवार, प्रशांत भावसार उपस्थित होते.