
इचलकरंजीत ललित कला उत्सव
ich202.jpg
83980
इचलकरंजी : ललित कला महाविद्यालयात चित्रप्रदर्शन भरवले.
इचलकरंजीत ललित कला उत्सव
इचलकरंजी : ललित कला महाविद्यालयात ललित कला उत्सव झाला. याअंतर्गत भरवलेल्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांच्याहस्ते झाले. यानंतर प्रसिद्ध चित्रकार रमण लोहार, (गडहिंग्लज) यांचे व्यक्तिचित्रण प्रात्याक्षिक तसेच चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे (जयसिंगपूर) यांच्या रचनाचित्राचा स्लाईडशो व चर्चासत्र झाले. संस्थेचे अध्यक्ष व्ही. आर. कुलकर्णी, उपाध्यक्ष पद्माकर तेलसिंगे, राजेंद्र कडाळे, आप्पासो वाघमारे, मनोहर नवनाळे, तुषार सुलतानपुरे, अमोल परीट, प्राचार्य विश्वास पाटील, प्रा. दादासो जंगटे, प्रा. श्रृती रुग्गे, नितीन सुतार, विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्नील मिठारी, सेजल कांबळे उपस्थित होते. चार दिवस खुल्या असणाऱ्या या चित्रप्रदर्शनाचा कलारसिकांनी लाभ घेतला.
-------
ich204.jpg
83982
इचलकरंजी : आपटे वाचन मंदिर येथे कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक दिली.
इचलकरंजी : आपटे वाचन मंदिर येथे कथाकथन स्पर्धा झाल्या. कै. रामभाऊ आपटे पुण्यतिथीनिमित्त झालेल्या स्पर्धेत ५२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत अनुक्रमे स्वरूप गोंदकर (अनंतराव भिडे विद्यामंदिर), आर्या माने (गर्ल्स हायस्कूल), निधी म्हेतर (बालाजी पब्लिक स्कूल) तर उत्तेजनार्थ पारितोषिक कीर्ती ढवळे (गर्ल्स हायस्कूल) कौशल घोडके (राणी लक्ष्मीबाई विद्यामंदिर) यांनी मिळवले. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. कविता नेर्लेकर उपस्थित होत्या. सौ. ऋतुजा जोशी, सौ. सीमा उरुणकर परीक्षक होत्या. स्वागत सौ. सुषमा दातार यांनी केले. संचालक प्रा. मोहन पुजारी यांनी प्रास्ताविक केले. आभार माया कुलकर्णी यांनी मानले. डॉ. कुबेर मगदूम यांचे उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके दिली.
-----
ich203.jpg
83981
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात सदिच्छा भेटप्रसंगी सत्यवान हाके यांचा प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी सत्कार केला.
पोलिस निरीक्षक हाके यांचा सत्कार
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयाला पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सदिच्छा भेट दिली. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी श्री. हाके यांचा सत्कार केला. श्री. हाके यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाविद्यालयास भेट दिली. प्राचार्य डॉ. पाटील यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. उपप्राचार्य डी. सी. कांबळे, एनसीसी प्रमुख मेजर मोहन वीरकर, दशरथ माने, क्रीडाप्रमुख मुजफ्फर लगीवाले, प्रशांत कांबळे, व्यंकटेश माने आदी उपस्थित होते.
-------
माधव विद्यामंदिरात मातृ पितृ दिन
इचलकरंजी : माधव विद्यामंदिरात मातृ पितृ दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी माता पिता पालकांचे पाद्य पूजन केले. पालकांचे औक्षण करून त्यांना भेटवस्तू दिल्या. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. हेमा चोपडा उपस्थित होत्या. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. व श्री. पांडुरंग धोंडपुडे, मुख्याध्यापिका स्वाती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सौ. चोपडा यांनी आई वडिलांवर आधारित अनेक आध्यात्मिक गोष्टी समजावून सांगत मुलांच्या जीवनातील पालकांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. तृप्ती उमराणी यांनी केले. सूत्रसंचालन सौ. सुजाता साळवी यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रतिभा करांडे यांनी केली.