चंदगड अर्बन बॅंकेवर सत्ताधाऱ्यांची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड अर्बन बॅंकेवर सत्ताधाऱ्यांची बाजी
चंदगड अर्बन बॅंकेवर सत्ताधाऱ्यांची बाजी

चंदगड अर्बन बॅंकेवर सत्ताधाऱ्यांची बाजी

sakal_logo
By

chd201.jpg
84071
चंदगड ः विजयानंतर सभासदांनी दयानंद काणेकर, सुनील काणेकर, प्रमोद कांबळे यांना उचलून घेऊन जल्लोष केला.
------------
चंदगड अर्बन बॅंकेवर सत्ताधाऱ्यांची बाजी
विरोधकांना दोन जागा; निकालानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २० ः येथील चंदगड अर्बन बॅंकेवर सत्ताधारी दयानंद काणेकर गटाची सत्ता कायम राहिली. तेरा पैकी अकरा जागा जिंकून या गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधी आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. बॅंकेसाठी सत्तारुढ आघाडी विरोधात परिवर्तन विकास आघाडीत चुरशीने मतदान झाले होते. आज येथील रवळनाथ मंदिराच्या सभागृहात मतमोजणी झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
जागा वाटपावरून मतभेद झाल्याने निवडणूक लागली. तेरा जागांसाठी सहा अपक्षांसह ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दोन्ही आघाडींकडून प्रत्येक सभासदांना गाठून प्रचारावर भर दिला. राजकीय बळ वापरले गेले. विरोधी आघाडीतून सचिन बल्लाळ व सुरेश सातवणेकर या दोघांनाच पसंती मिळाली. बहुसंख्य सभासदांनी काणेकर यांच्या कारभारावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा त्यांच्याच हातात बॅंकेच्या सत्तेच्या चाव्या सुपूर्द केल्या. निवडणूक अधिकारी प्रेमकुमार राठोड, शैलेश सावंत, उमेश शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते अशी ः दयानंद काणेकर ३१६७, बाबू हळदणकर २५३९, प्रमोद कांबळे २४८१, सुनील काणेकर २९१६, अरुण पिळणकर २६८८, सचिन बल्लाळ २७३६, सुरेश सातवणेकर २५६५, संतोष वणकुंद्रे २५६०, फिरोज मुल्ला २५५८, अरुण गवळी ३२६७, राजेंद्र परीट २९७१, अर्चना ढेरे २९८३, माधवी मुळीक २७६६.
---------------------
यांची बॅंकेत एंट्री
सुनील काणेकर, प्रमोद कांबळे, संतोष वणकुंद्रे, फिरोज मुल्ला, अर्चना ढेरे, माधवी मुळीक यांना बॅंकेत प्रथमच संचालकपदाची संधी मिळाली.
-------------
केवळ तीन मतांनी पराभूत
सत्तारुढ आघाडीतील आनंद ओऊळकर हे केवळ तीन मतांनी पराभूत झाले. सर्वसाधारण गटातून त्यांची उमेदवारी होती. या गटातून आठ उमेदवार निवडायचे होते. मतानुक्रमे ते नवव्या स्थानावर राहिले.
----------
* चुलते हरले, पुतण्या जिंकला
सत्तारुढ आघाडीतून उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांची उमेदवारी होती. ते विजयी झाले. विरोधी आघाडीतून त्यांचे चुलते अली मुल्ला पराभूत झाले.