कुपेकर भाजपमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुपेकर भाजपमध्ये
कुपेकर भाजपमध्ये

कुपेकर भाजपमध्ये

sakal_logo
By

फोटो- 84142
...

संग्रामसिंह कुपेकर भाजपच्या वाटेवर
---
फडणवीस यांची घेतली भेट; लवकरच पक्ष प्रवेशासाठी मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून चंदगड विधानसभा मतदारसंघाची दोन वेळा निवडणूक लढविलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्रामसिंह कुपेकर भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. आज त्यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हॉटेल पंचशीलमध्ये भेट घेऊन चर्चा केली. लवकरच मेळावा घेऊन ते पक्षप्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य राहिलेले संग्रामसिंह हे विधानसभेचे माजी अध्यक्ष (कै.) बाबासाहेब कुपेकर व ‘राष्ट्रवादी’च्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे पुतणे आहेत. कुपेकर यांचे राजकीय वारस अशी त्यांची ओळख होती. पण, बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर त्यांना ‘राष्ट्रवादी’ने उमेदवारी डावलली. त्यामुळे २०१४ मध्ये त्यांनी श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांच्याच विरोधात शिवसेनेच्या तिकिटावर चंदगड विधानसभा लढवली. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते शिवसेनेचे उमेदवार होते. आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्यावर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात भाजपकडेही तगडा उमेदवार नाही, त्याचा फायदा उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज खासदार धनंजय महाडिक यांच्या मध्यस्थीने श्री. फडणवीस यांची भेट घेतली. पक्ष प्रवेशाबाबत विचार करू, तोपर्यंत कामाला लागा, असे श्री. फडणवीस यांनी त्यांना सांगितल्याचे समजते.