
अंजूमन, ऊर्दूमधील गैरव्यवहाराची चौकशी करा
ajr201.jpg
84078
आजरा ः येथील तहसीलदार कार्यालयावर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढला.
------------------
अंजूमन, ऊर्दूमधील गैरव्यवहाराची चौकशी करा
मुक्ती संघर्षतर्फे मागणी; आजरा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २० ः येथील तहसीलदार कार्यालयावर मुक्ती संघर्षतर्फे मोर्चा काढला. अंजुमन संस्था व ऊर्दू हायस्कूलमधील गैरव्यवहाराबाबत चौकशी करून संबंधितावर कारवाई करा, अशी मागणी केली. या वेळी तहसीलदारांना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठ, संभाजी चौक मार्गे मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी मुक्ती संघर्षचे राज्य संघटक संग्राम सावंत, राजाभाऊ शिरगुप्पे, पंचायत समितीचे माजी सभापती बशीर खेडेकर, अबुसईद माणगावकर, संजय घाटगे, काशिनाथ मोरे यांची भाषणे झाली. संजय सावंत, मजीद मुल्ला, दिगंबर विटेकरी, काशिनाथ मोरे, वसंत शेटके, संजय कांबळे, युसुफ मुल्ला, शरीफ खेडेकर, मोसीन तगारे, अमित खेडेकर, ताहिर ख. माणगावकर, राहुल दास, विनायक कांबळे आदी उपस्थित होते.
-------------
संबंधित शिक्षिकेकडे एकही कागदपत्र नाही. शिक्षण विभाग व संस्थेचे कोणतेही आदेश नाहीत. २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत कर्नाटकात बीएड केले आहे. पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी त्यांना मानद सेवक म्हणून दाखला दिला आहे. त्यांच्याकडे कोणतेही शैक्षणिक कागदपत्रे नाहीत. फक्त दडपशाहीचा मार्गाने नोकरी मिळवण्याचे काम करत आहेत. हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत बदनामीचा दावा दाखल करणार आहे.
- डी. डी. कोळी, प्रशासक, नायब तहसीलदार