
पोलिस एकत्रित
लाईन बाजार घटनेप्रकरणी
दोघांवर विनयभंगाचा गुन्हा
कोल्हापूर : कसबा बावडा येथील लाईन बाजार परिसरात रविवारी रात्री झालेल्या दोन गटांतील दंगलीत दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली. तसेच आज त्या ठिकाणी परिसरातील सर्व नागरिकांची बैठक घेऊन शांतता प्रस्तापित करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले. काल झालेल्या घटनेचा कोणताही संदर्भ न ठेवता भविष्यात सर्वांनी एकत्रित राहण्याची प्रतिज्ञा घेतल्याची माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली.
--------------
अपघातात एकजण जखमी
कोल्हापूर : रामानंदनगर येथील पुलावर रविवारी रात्री झालेल्या अपघातात विश्वनाथ मारुती गुरव (वय ३५, रा. जीवबानाना पार्क) हे जखमी झाले. ते सीपीआरमध्ये तंत्रज्ञ आहेत. रविवारी रात्री ड्यूटी संपवून घरी जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यांना स्थानिक तरुणांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
-----------------