बुझवडेत क्रिकेट स्पर्धेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुझवडेत क्रिकेट स्पर्धेला प्रतिसाद
बुझवडेत क्रिकेट स्पर्धेला प्रतिसाद

बुझवडेत क्रिकेट स्पर्धेला प्रतिसाद

sakal_logo
By

chd216.jpg
84332
बुझवडे ः मनोहर देसाई यांनी विजेत्या संघांना बक्षीस वितरण केले. शंकर भेकणे, दिलीप भेकणे, रमेश देसाई आदी उपस्थित होते.
------------------------------
बुझवडेत क्रिकेट स्पर्धेला प्रतिसाद
चंदगड ः बुझवडे (ता. चंदगड) येथे राजे क्रिकेट लीगने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. परिसरातील आठ संघ सहभागी झाले होते. चौदा सामने खेळवले गेले. अंतिम स्पर्धेत एसपी क्लब बुझवडे संघाने विजेतेपद पटकावले. सिद्धांत अकरा या संघाने उपविजेतेपद पटकावले. गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासकीय अध्यक्ष अभय देसाई, उद्योजक अनिल दळवी यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. अडकूर येथील युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर देसाई, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर भेकणे, दिलीप भेकणे, रमेश देसाई यांच्याहस्ते बक्षीस वितरण केले.