
शिव रंगोत्री चित्रप्रदर्शन
84418
कोल्हापूर : शिव रंगोत्री दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी झालेली गर्दी. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
शिव रंगोत्री छायाचित्र प्रदर्शन सुरू
कोल्हापूर, ता. २१ : प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीज विश्व विद्यालय व कलामहर्षी बाबुराव पेंटर आर्ट फाउंडेशनतर्फे आयोजित शिवरंगोत्री छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज झाले. शाहू स्मारक भवनाच्या कलादालनात झालेल्या कार्यक्रमात बाबुराव पेंटर यांच्या कन्या विजयमाला व आशालता मेस्त्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
प्रदर्शनात कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या चित्रपट, मुकपटातील दुर्मिळ छायाचित्रे पहायला मिळत आहेत. तसेच कलेचा उगम, त्याचा विकास आणि भविष्यातील कलेचा उपयोग यांची माहिती देणारे फलकही प्रदर्शनात मांडले आहेत. या वेळी अभिनेते आकाराम पाटील, डॉ. शंकर माळी, प्रा. कविता गगराणी, वैशाली पाटील, किरण नामजोशी, सुनंदा बहेनजी, अर्जुन मेस्त्री, अनुराधा मेस्त्री आदी उपस्थित होते.