लक्ष्मीनारायण मंदिर प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मीनारायण मंदिर प्रतिष्ठापना
लक्ष्मीनारायण मंदिर प्रतिष्ठापना

लक्ष्मीनारायण मंदिर प्रतिष्ठापना

sakal_logo
By

84407
कोल्हापूर : येथील लक्ष्मीनारायण मंदिरात मंगळवारी विविध धार्मिक विधी झाले.

श्री लक्ष्मीनारायण मंदिरात
आज महागणपतीची प्रतिष्ठापना
विविध धार्मिक विधी; गोपूरपंचकलशाचीही होणार प्राणप्रतिष्ठा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : व्हीनस कॉर्नर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात उद्या (ता. २२) महागणपती मूर्ती आणि गोपूरपंचकलशाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आजपासून मंदिरात विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला.
अंबाबाई मंदिर परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिर १९७६ मध्ये हटवल्यानंतर २००० मध्ये व्हीनस कॉर्नर येथे मंदिर बांधले आणि जुन्याच मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. मात्र, त्या एकशे तीस वर्षांपूर्वीच्या आणि पश्चिमाभिमुख असल्याने २०१५ मध्ये मंदिरात नव्या पूर्वाभिमुख मूर्तींची पुनःप्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर आता महागणपती आणि गोपूरपंचकलशाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
सकाळपासून मूर्तीचा जलाधिवास, धान्याधिवास, पुष्‍प, फल, वस्त्र अधिवास आदी विधी झाल्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम रंगला. उद्या (ता. २२) सकाळी साडेनऊला शहरातून भव्य शोभायात्रा होईल. त्यानंतर साडेअकरा ते साडेबारा या वेळेत प्राणप्रतिष्ठापना आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. गोपूर पंचकलशाचे मुख्य यजमान हरिष जैन आहेत, तर रूईकर कॉलनीतील चित्रकार विक्रमसिंह पाटील यांनी महागणपतीची मुर्ती ट्रस्टला सुपूर्द केली आहे. सोहळ्यासाठी पुरूषांसाठी कुर्ता व पायजमा आणि महिलांसाठी लाल रंगाची साडी असा पेहराव असून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.