Tue, March 21, 2023

गड-किलबिल विद्यामंदिर
गड-किलबिल विद्यामंदिर
Published on : 22 February 2023, 1:50 am
‘किलबिल’मध्ये पालकांसाठी व्याख्यान
गडहिंग्लज : येथील किलबिल विद्यामंदिरमध्ये पालकांसाठी व्याख्यान झाले. आकाश पाटील (जळगाव) यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘आपल्या पाल्याला समजावून घेतले पाहिजे. योग्य वयातच संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची असते. मुलांना स्वाभीमानी बनवा. कारण ती काळाची गरज आहे.’ संस्थेच्या अध्यक्षा अंजली हत्ती, दयानंद हत्ती, डॉ. सरस्वती हत्ती, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, शहजादी पटेल, प्रतीक क्षीरसागर यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. राहूल शेट्टी यांनी आभार मानले.