Wed, March 22, 2023

इस्टेट कारवाई
इस्टेट कारवाई
Published on : 22 February 2023, 6:23 am
भाडे भरले नसल्याने
सात गाळे सिल
कोल्हापूर : गाळेधारकांनी ॲडव्हानमध्ये भाडे भरले नसल्याने शाहू क्लॉथ मार्केटमधील पाच तर व्हीनस कॉर्नर मार्केटमधील दोन गाळे आज महापालिकेने सिल केले. महापालिकेच्या गाळेधारकांना राज्य शासनाच्या पत्रानुसार हमीपत्र घेऊन ॲडव्हान्स भाडे भरावे म्हणून कळविले होते. तरीही गाळेधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शाहू क्लॉथ मार्केटमधील पाच व व्हिनस कॉर्नर मार्केटमधील दोन गाळे सिल करण्यात आले. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व उपायुक्त रविकांत आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. गाळेधारकांनी आजअखेर ३ कोटी रूपये ॲडव्हान्स भाड्यापोटी भरले आहेत. इतरांनी थकबाकीची रक्कम लवकर भरणा करावी. अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचे इस्टेट विभागाने कळवले आहे.