ए.एस.ट्रेडर्स सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ए.एस.ट्रेडर्स सुनावणी
ए.एस.ट्रेडर्स सुनावणी

ए.एस.ट्रेडर्स सुनावणी

sakal_logo
By

ए.एस.ट्रेडर्सच्या फसवणुकीत
इतर कंपन्यांचा संबंध नाही

ॲड. राणेंचा युक्तिवाद ः फिर्यादींच्या वतीने संबंध असल्याचा दावा, सोमवारी सरकारी युक्तिवाद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीशी आमचा काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद आज संशयिताचे वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात केला. जिल्हा व सत्र न्यायालयात आज ही सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीश (४) एस. पी. गोंधळेकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी सोमवारी(ता.२७) होणार आहे. त्यावेळी सरकारी वकील अल्ताफ पिरजादे त्यांची बाजू मांडणार आहेत.

ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या संशयितांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या वतीने आज ॲड. राणे यांनी युक्तिवाद केला. फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीशी संबंधित व्यक्तींचा काहीच संबंध नाही. ए. एस. ट्रेडर्सकडून करून घेतलेल्या सॉफ्टवेअरच्या कामांचे पैसे त्यांना दिले आहेत. त्याशिवाय त्यांच्याशी अन्य कोणताही आर्थिक संबंध नाही. तसेच आम्ही कोणाकडूनही पैसे गोळा केलेले नाहीत. त्यांना जादा परताव्याचे आमिष दिलेले नाही. त्यामुळे आमचा फसवणुकीत काहीही संबंध नसल्याचा युक्तिवाद ॲड. राणे यांनी केला, तर फिर्यादी रोहित ओतारी यांचे वकील महंतेश कोले यांनी त्यावर आक्षेप घेत, गुन्हे दाखल असलेले संशयित आणि त्यांचा ए. एस. ट्रेडर्स कंपनीशी संबंध असल्याची कागदपत्रे न्यायालयात सादर केली.
पुढील सुनावणीत सरकारी वकील अलताफ पिरजादे युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे, तरीही सध्या मुंबई उच्च न्यायालयात याबाबतची याचिका दाखल असल्यामुळे तेथील निर्णयापर्यंत जिल्हा न्यायालयातील निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच याबाबत विरोधी कृती समितीने आक्षेप नोंदवले आहेत.