कृष्णाईतर्फे अग्नीवीराचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णाईतर्फे अग्नीवीराचा सत्कार
कृष्णाईतर्फे अग्नीवीराचा सत्कार

कृष्णाईतर्फे अग्नीवीराचा सत्कार

sakal_logo
By

gad231.jpg
84792
औरनाळ : कृष्णाई ॲकॅडमीतर्फे रोहनचा सत्कार करताना मनीषा पोवार. शेजारी ॲकॅडमीचे पदाधिकारी, प्रशिक्षणार्थी.

कृष्णाईतर्फे अग्निवीराचा सत्कार
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील कृष्णाई भरतीपूर्व प्रशिक्षण सामाजिक शैक्षणिक अॅकॅडमीतर्फे रोहन सावंत याचा सत्कार केला. मनीषा पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. एस. एस. सावंत अध्यक्षस्थानी होते. रोहनची नुकतीच अग्नीवीर निवड प्रक्रियेतून टेक्निशियन म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल सौ. पोवार यांच्याहस्ते सत्कार झाला. ऋतुजा रेडेकर, सौ. पोवार, प्रा. सावंत यांची भाषणे झाली. विक्रांत गुरव, विनायक नाईक, मयुर चौगुले, रमेश सावंत, काशिनाथ सावंत यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सतीश रेडेकर यांनी स्वागत केले. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संपत सावंत यांनी आभार मानले.
--------------------------
gad232.jpg
84793
गडहिंग्लज : ओंकार महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. सुरेश चव्हाण. व्यासपीठावर प्रा. धर्मवीर क्षीरसागर, डॉ. अनिल पाटील.

ओंकारमध्ये व्हॅल्यू अॅडेड अभ्यासक्रम
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात व्हॅल्यू अॅडेड अभ्यासक्रमाचा प्रारंभ केला. राज्यशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे नेतृत्व विकास या विषयावरील हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. त्यांनी अभ्यासक्रमाचे महत्त्‍व सांगितले. डॉ. अनिल पाटील यांनी स्वागत केले. प्रा. धर्मवीर क्षीरसागर यांनी आभार मानले.