
घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रिका प्रकाशन
gad236.jpg
84849
गडहिंग्लज : संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त भित्तीपत्रिकेचे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. मंगलकुमार पाटील, डॉ. निलेश शेळके, डॉ. डी. एन. वाघमारे, डॉ. सरला आरबोळे आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------------------
घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रिका प्रकाशन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात समाजशास्त्र व एनएसएस विभागातर्फे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवले. संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी केले. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला. समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एनएसएस विभागाचे डॉ. निलेश शेळके, डॉ. डी. एन. वाघमारे, डॉ. सरला आरबोळे यांनी मार्गदर्शन केले. अधीक्षक हरिभाऊ पन्हाळकर, प्रा. विश्वनाथ पाटील, प्रा. व्ही. पी. प्रधान, प्रा. महेश पाटील, प्रा. पी. एस. कांबळे आदी उपस्थित होते. प्रा. फुलराणी रजपूत यांनी स्वागत केले. प्रा. महेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संपदा प्रधान यांनी आभार मानले.