रेनेसा डिजिटल इन्‍स्टिट्युटतर्फे बेसिक कम्य्पुटर कोर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेनेसा डिजिटल इन्‍स्टिट्युटतर्फे बेसिक कम्य्पुटर कोर्स
रेनेसा डिजिटल इन्‍स्टिट्युटतर्फे बेसिक कम्य्पुटर कोर्स

रेनेसा डिजिटल इन्‍स्टिट्युटतर्फे बेसिक कम्य्पुटर कोर्स

sakal_logo
By

84860
कोल्हापूर ः रेनेसां डिजिटल इन्स्टिट्युटतर्फे घेण्यात आलेल्या डिजिटल लिटरसी अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना शाहीन अन्सारी.

रेनेसा डिजिटल इन्‍स्टिट्युटतर्फे
बेसिक कम्य्पुटर कोर्स
कोल्हापूर ः रेनेसां डिजिटल इन्स्टिट्युट तर्फे घेण्यात आलेल्या तीन महिन्याचा बेसिक कम्‍प्युटर कोर्स मोफत पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शाहीन अन्सारी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप झाले. यावेळी त्या म्हणाल्या,‘‘या उपक्रमातून सर्वसामान्य स्त्रिया आणि शाळेत जाण्याची संधी न मिळालेल्या मुला-मुलींना डिजिटल लिटरसी देण्याचे काम कौतुकास्पद आहे. डिजिटल लिटरसी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची शक्ती देते. परंतु आज सोशल मिडीयामध्ये याचा होणारा वापर घातक आहे. त्यामुळे पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे.’’
संस्थेच्या प्रमुख रेहाना मुरसल यांनी तीन महिन्यांच्या कोर्स व्यतिरिक्त नवा जीवनानुभ देणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राजेंद्रनगर, विक्रमनगर, सासने मैदान येथे मोफत सुरू असलेल्या डिजिटल अभ्यासक्रमांचा आठशे महिलांनी लाभ घेतल्याचे सांगितले. यावेळी कृष्णा खोरे मंडळाचे संचालक खलील अन्सारी, अब्दुल बिडीवाले, हाजी शौकत मुतवली, तजन्नुम मोळे, रूमानाशेख, तस्निया चिकोडे, सलीम शेख, मोहम्मद रशीद, शौकत शेख उपस्थित होते.