
अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाला आमदार राजेश पाटील यांची भेट
gad237.jpg
84862
गडहिंग्लज : आमदार राजेश पाटील यांना मागण्यांचे निवेदन देताना अंगणवाडी कर्मचारी सभेच्या पदाधिकारी. शेजारी बाळेश नाईक, अमर चव्हाण.
----------------------------
अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाला
आमदार राजेश पाटील यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आमदार राजेश पाटील यांनी आज प्रांत कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी भेट दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न विधीमंडळात मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधनात वाढ करावी, कामगार कायद्याचे संरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (ता. २०) राज्यव्यापी संप पुकारला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, आज सायंकाळी चारच्या सुमारास आमदार राजेश पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय आहेत. विधीमंडळात त्याबाबत प्रश्न मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कर्मचाऱ्यांतर्फे मागण्यांचे निवेदन श्री. पाटील यांना दिले. पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य संघटक बाळेश नाईक, जिल्हाध्यक्षा अंजना शारबिद्रे, उपाध्यक्षा सुरेखा गायकवाड, तालुकाध्यक्षा राजश्री बाबन्नावर, भारती कुंभार, वंदना साबळे, अनिता देसाई यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.