फेसलेस प्रणालीतून ३५ हजार लर्निंग लायसन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेसलेस प्रणालीतून ३५ हजार लर्निंग लायसन्स
फेसलेस प्रणालीतून ३५ हजार लर्निंग लायसन्स

फेसलेस प्रणालीतून ३५ हजार लर्निंग लायसन्स

sakal_logo
By

5126
लर्निंग लायसन्ससाठी ‘फेसलेस’ला पसंती

वर्षात ३५ हजारांवर व्यक्तींनी घेतला लाभ; ३५ टक्के व्यक्तींची पसंती

लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : ऑनलाइन अर्थात फेसलेस प्रणालीतून वर्षात ३५ हजाराहून अधिक व्यक्तींनी वाहन चालविण्याचा कच्चा परवाना (लर्निंग लायसन्स) मिळवले. ही प्रक्रिया इंटरनेट असलेल्या मोबाईल हँडसेटवरूनही होऊ शकते. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची गरज नाही. त्यामुळेच ‘फेसलेस’ प्रणालीला पसंती मिळत आहे. एकूण कच्च्या परवान्यापैकी ३५ टक्के व्यक्ती ‘फेसलेस’ प्रणालीचा वापर करीत आहेत.
मोबाईल हॅण्डसेटवरच कागदपत्रे स्कॅन करून वाहन चालविण्याचा कच्चा परवाना काढला जाऊ शकतो. त्यामुळेच ३५ हजार २७७ व्यक्तींनी फेसलेस परवाना घेतला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यातून देण्यात आली. वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी पहिल्या टप्प्यात कच्चे लायसन्स काढावे लागते. यासाठी वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागत नाही. वय १८ वर्षापेक्षा अधिक, भारतीय नागरिक, वैद्यकीय सक्षमता , अशा प्राथमिक गोष्टींची पूर्तता करावी लागते. याबाबतची कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड केल्यानंतर कच्चा परवाना मिळतो.
परवाना काढणारी व्यक्ती घरबसल्या इंटरनेट असलेल्या मोबाईल हँडसेटवरून सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करू शकतो. याचे सरकारी शुल्कही ऑनलाइन भरू शकतो. हा परवाना ऑनलाईन मिळाल्यावर महिन्यानंतर परवान्याच्या आधारावर पक्का परवाना मिळू शकतो. मात्र हा परवाना मिळवण्यासाठी संबंधित चालकाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन वाहन चालविण्याची चाचणी द्यावी लागते.
फेसलेस सुविधेचा वापर करण्यासाठी पुढील लिंक, संकेतस्थळाचा वापर करावा.https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do
किंवा sarathi.parivahan.gov.in

-----------
आकडे बोलतात...
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान

परवाने घेतलेले १ लाख ३४ हजार ३३७
‘फेसलेस’चा वापर ३५ हजार २७७
ऑफलाईन पूर्तता ९९ हजार ६०
-----
‘फेसलेस’ प्रणालीमुळे घरबसल्याही मोबाईल हँडसेटचा वापर करून वाहन चालविण्याचा कच्चा परवाना मिळू शकतो. याच्याशी संबंधित लिंकवर जाऊन क्लिक केल्यास, सविस्तर माहिती मिळेल. येथे कागदपत्र अपलोड करताना स्वतःची सही करून कागदपत्रे योग्य जोडली आहेत याची खात्री करावी.
- रोहित काटकर (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी)
-----

----