कोविड ३७ पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड ३७ पात्र
कोविड ३७ पात्र

कोविड ३७ पात्र

sakal_logo
By

कोविडच्या शासन सानुग्रह
अनुदानासाठी ३७ अर्ज पात्र

कोल्हापूर, ता. २४ : करोनाने मृत्यू झालेल्या ३७ रुग्णांच्या नातेवाईकांचे अर्ज शासनाच्या सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरले. आज ४० अर्जांची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सुनावणी घेतली.
शासनाकडून ५० हजार सानुग्रह अनुदान देण्यात येते. महापालिकेकडे १०४ अर्ज आले आहेत. यापैकी ४० अर्जावर ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. छाननी अंती ३७ अर्ज अनुदानास पात्र झाले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी करण्यात येत आहे. मंजूर झालेले अर्ज अनुदान मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविले जाणार आहेत. समिती अध्यक्ष, उपायुक्त रविकांत आडसुळ, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव, समिती सदस्य डॉ. गिरीष कांबळे, डॉ. श्रध्दा भास्कर, समन्वय अधिकारी मनिष पवार यांनी केली.
मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी कोविड १९ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी पोर्टल बंद होणार असल्याने लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. त्यापूर्वी महापालिकेच्या आरोग्याधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ज्या नागरीकांनी यापूर्वी अर्ज सादर केला आहे, परंतु अद्यापही अनुदान जमा झालेले नाही. त्यांनी महापालिकेच्या आरोग्याधिकारी कार्यालयात सकाळी अकरा ते दोन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.