आजऱ्याचा विकास आराखडा रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्याचा विकास आराखडा रद्द करा
आजऱ्याचा विकास आराखडा रद्द करा

आजऱ्याचा विकास आराखडा रद्द करा

sakal_logo
By

ajr244.jpg...
85087
आजरा ः मुख्याधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार. यावेळी उपस्थित नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, आनंदा कुंभार, अरुण देसाई आदी.
----------------
आजऱ्याचा विकास आराखडा रद्द करा
भाजपची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २४ ः आजरा शहराचा विकास आराखडा (डी. पी. प्लॅन) चुकीच्या पध्दतीने तयार केलेला आहे. तो रद्द करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
नगररचना विभागातर्फे आजरा शहराचा नगरविकास आराखडा प्रसिध्द केला असून त्याबाबत सहमती मागवल्या आहेत. मुळातच प्रथम दर्शनी आराखड्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक स्मशानभूमीमधून रस्त्याचा आराखडा पडला आहे. नदीकाठीवरील क्षेत्र हे निवासी कारणासाठी आरक्षित जाहीर केले आहे. प्रत्यक्षात यातील बहुतांशी क्षेत्र हे पुरबाधित ओळखले जाते. यासारख्या त्रुटी या आराखड्यात दिसत आहे. तसेच हा आराखडा प्रदीर्घ कालावधीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. त्यामुळे तो सामान्य शहरवासियांच्या निदर्शनास सहजरित्या आणला गेला पाहीजे. मुळातच या आराखड्याबाबत शहरवासीय अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या पुढाकाराने शहरवासियांनी याबाबत विशेष सभा घेवून आराखडा समजावून सांगणे गरजेचे आहे. याबाबत आपण तत्काळ कारवाई व केवळ याच विषयावर स्वतंत्र बैठक बोलवावी. असे न झाल्यास शहरवासियांना कायदेशीर मार्गाने दाद मागण्याचा हक्क राहील. भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. नगरसेवक आनंदा कुंभार, भाजपचे नेते अरुण देसाई उपस्थित होते.